r ashwin ben stokes yandex
Sports

IND vs ENG 3rd Test: राजकोट कसोटी ठरणार रेकॉर्ड ब्रेकिंग! मोडले जाणार हे मोठे रेकॉर्ड्स

India vs England 3rd Test Record News: हा सामना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी अतिशय खास असणार आहे.

Ankush Dhavre

India vs England 3rd Test,Records:

भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना राजकोटमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांनी कसून सराव केला आहे. या सामन्यासाठी इंग्लंडने एक दिवसापूर्वीच आपल्या प्लेइंग ११ ची घोषणा केली.

या संघातून शोएब बशीरला डच्चू देण्यात आला आहे. हा सामना इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि भारताचा स्टार फिरकीपटू आर अश्विनसाठी अतिशय खास असणार आहे. दोघांनाही मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

राजकोटच्या मैदानावर होणारा तिसरा कसोटी सामना हा बेन स्टोक्सच्या कसोटी कारकिर्दीतील १०० वा सामना असणार आहे. यासह त्याला गॅरी सोबर्स आणि जॅक कॅलिस सारख्या दिग्गजांच्या रेकॉर्डच्या यादीत प्रवेश करण्याची संधी असणार आहे.

बेन स्टोक्सने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजी करताना ९९ कसोटी सामन्यांमध्ये ६००० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना तो लवकरच २०० गडी बाद करण्याचा पल्ला गाठू शकतो. हा रेकॉर्ड करण्यासाठी त्याला केवळ ३ गडी बाद करण्याची गरज आहे. त्यामुळे बेन स्टोक्ससाठी हा सामना अतिशय खास असणार आहे. (Cricket news in marathi)

आर अश्विन करणार मोठा रेकॉर्ड..

आर अश्विनला देखील मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे. आर अश्विनने आतापर्यंत खेळलेल्या ९७ कसोटी सामन्यांमध्ये ४९९ गडी बाद केले आहेत. राजकोट कसोटीत केवळ १ गडी बाद करताच तो कसोटी क्रिकेटमध्ये ५०० गडी बाद करण्याचा रेकॉर्ड करणार आहे.

गोलंदाजीसह फलंदाजीतही त्याचा दबदबा पाहायला मिळाला आहे. त्याने भारतीय संघासाठी कसोटीत फलंदाजी करताना ३२७१ धावा केल्या आहेत. यादरम्यान १२४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर त्याने ५ शतक आणि १४ अर्धशतकं झळकावली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT