Ben stokes twitter
Sports

Ben Stokes Statement: दारुण पराभवानंतर बेन स्टोक्सचा रडीचा डाव? म्हणतो, ' क्रिकेटमधून हा नियम काढून टाका..'

India vs England 3rd test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत ४३४ धावांनी विजय मिळवला आहे.

Ankush Dhavre

Ind vs Eng 3rd Test, Ben Stokes ON DRS:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये राजकोटच्या मैदानावर तिसरा कसोटी सामना पार पडला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी अष्टपैलू कामगिरी करत ४३४ धावांनी विजय मिळवला आहे.

यासह मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. यापूर्वी झालेल्या विशाखापट्टनम कसोटीतही इंग्लंडला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान सलग २ पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने DRS वर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Ben Stokes On DRS)

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अंपायर्स कॉल काढून टाकण्याची मागणी केली आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावात इंग्लंडचा फलंदाज झॅक क्रॉली अंपायर्स कॉलमुळे आऊट झाला होता. अंपायरने आऊट दिल्यानंतर त्याने DRS ची मागणी केली. DRS मध्ये दिसलं की, चेंडू स्टंपला लागत नव्हता. मात्र अंपायरने बाद घोषित केल्यामुळे त्याला पायचीत होऊन माघारी परतावं लागलं.

झॅक क्रॉली बाद होण्यावरून बेन स्टोक्स आणि इंग्लंडचा हेड कोच ब्रेंडन मॅक्क्यूलमने मॅच रेफ्रीसोबत चर्चा देखील केली. याबाबत बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, ' रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता की, चेंडू स्टंपला लागतच नव्हता. मात्र या निर्णयाला जेव्हा अंपायर्स कॉल ठरवलं गेलं,तेव्हा आम्हाला आश्चर्य वाटलं. मॅच रेफ्री स्पष्टीकरण देत म्हणाले की, आकडेवारीच्या हिशोबाने चेंडू स्टंपला जाऊन लागत होता. मात्र प्रोजेक्शन व्यवस्थित झालं नव्हतं. नेमकं काय घडलं याचा मला अर्थ समजला नाही.' (Cricket news in marathi)

तसेच तो पुढे म्हणाला की, ' मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की, अंपायर्स कॉल काढून टाकला पाहिजे. जर चेंडू स्टंपला जाऊन लागतोय तर लागतोय. क्रिकेटच्या मैदानावर नियम सर्वांसाठी सारखेच असायला हवे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

Anant Chaturdashi 2025 live updates : कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक रेंगाळली

Dhokla Recipe : ढोकळा जाड होतो? बॅटर नीट होतंच नाही? वाचा मऊसुत ढोकळ्याची रेसिपी

Face Care: विड्याच्या पानांनी तयार केलेला फॅसपॅक लावा चेहऱ्यावर, १५ मिनिटांत स्किन करेल ग्लो

SCROLL FOR NEXT