team india twitter
Sports

IND vs ENG: T-20 नंतर वनडेतही टीम इंडियाचा 'विराट' विजय! इंग्लंडचा 3-0 ने व्हाईटवॉश

India Beat England In 3rd ODI: भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने शानदार विजय मिळवला आहे. यासह मालिका ३-० ने खिशात घातली आहे.

Ankush Dhavre

टी-२० मालिकेनंतर वनडे मालिकेतही भारतीय संघाने इंग्लंडला चांगलीच धूळ चारली आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला.

या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना ३५६ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा डाव २१४ धावांवर आटोपला. यासह भारतीय संघाने हा सामना १४२ धावांनी जिंकून मालिका ३-० ने खिशात घातली आहे.

फलंदाजीत हिट ठरल्यानंतर भारतीय गोलंदाजही चमकले. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. सलामीला फलंदाजी करताना, शुभमन गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली.

त्यानंतर श्रेयस अय्यरने ७८ धावांची खेळी केली. गेल्या काही महिन्यांपासून फलंदाजीत संघर्ष करत असलेला विराट कोहली या डावात चमकला. त्याने ५२ धावांची खेळी केली. शेवटी केएल राहुलने ४० धावांची खेळी करत भारतीय संघाची धावसंख्या ३५६ धावांवर पोहोचवली.

भारतीय गोलंदाजही चमकले...

पहिल्या डावात भारतीय फलंदाजांचा हल्लाबोल पाहायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांची हवा पाहायला मिळाली. डोंगराइतक्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या इंग्लंड संघातील एकाही फलंदाजाला ५० धावांचा आकडा देखील पार करता आला नाही.

इंग्लंडकडून फिल सॉल्टने २३, बेन डकेटने ३४, टॉम बेंटमने ३८ आणि जो रुटने २४ धावांची खेळी केली. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंग, हर्षित राणा,अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादवने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT