IND vs ENG: तिसऱ्या वनडेसाठी टीममध्ये मोठ्या बदलांची शक्यता; रोहित घेणार कठीण निर्णय? पाहा संभाव्य प्लेईंग ११

India vs England 3rd ODI Playing XI: सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल. रोहित शर्मा काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या सर्वांचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे.
India vs England 3rd ODI Playing XI
India vs England 3rd ODI Playing XIsaam tv
Published On

भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यातील टी-२० सिरीजनंतर टीम इंडियाने वनडे सिरीज देखील जिंकली आहे. मात्र अजून या सिरीजमधील एक शेवटचा सामना खेळायचा बाकी आहे. आज हा सामना खेळवला जाणार असून तो अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. यामध्ये सर्वात मोठा प्रश्न म्हणजे तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल. रोहित शर्मा काही महत्त्वाचा निर्णय घेऊ शकेल का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. सध्या सर्वांचं लक्ष चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे.

यशस्वीला मिळणार का संधी?

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची वनडे सिरीज आधीच जिंकली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्याची तयारी करण्याची वेळ आता आलीये. त्यामुळे आजच्या सामन्याच्या तिसऱ्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही मोठे बदल दिसले तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. शुभमन गिलने पहिले दोन सामने खेळले आहेत. पहिल्या सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर खेळायला आला. तर दुसऱ्या सामन्यात त्याला कर्णधार रोहित शर्मासोबत ओपनिंगला आला होता.

India vs England 3rd ODI Playing XI
IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन टीमला नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक

गिलने यावेळी चांगली कामगिरी केलीये. अशा परिस्थितीत त्याला तिसऱ्या सामन्यात विश्रांती मिळू शकते. यशस्वी जयस्वालने आतापर्यंत सिरीजमधील फक्त एकच सामना खेळला आहे. मात्र त्या सामन्यातंही त्याला चांगली कामगिरी केलेली दिसत नाही. मात्र आजच्या सामन्यात यशस्वी जयस्वालला आणखी एक संधी दिली जाऊ शकते.

India vs England 3rd ODI Playing XI
Ranji Trophy: शार्दुल ठरला मॅचविनर! रहाणेही चमकला; हरियाणाला धूळ चारत मुंबईची सेमीफायनलमध्ये धडक

पंतला संधी मिळण्याची शक्यता!

ऋषभ पंत हा देखील एक मोठा मुद्दा असून आतापर्यंत केएल राहुलने दोन वनडेमध्ये विकेटकीपिंगची जबाबदारी स्वीकारली होती. रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही केएल राहुलला संधी देण्याचा विचार केला असून ऋषभ पंतला संधी मिळणार का हा प्रश्न आहे. अशावेळी आजच्या सामन्यात पंतला संधी दिली जाऊ शकते.

India vs England 3rd ODI Playing XI
Virat Kohli : चाहत्यांची प्रचंड गर्दी, तो आला अन् तिला मिठी मारली, 'ती' महिला कोण? जिच्यासाठी कोहलीने केली नाही सुरक्षेची पर्वा, VIDEO व्हायरल

'या' खेळाडूचा होणार प्लेईंग ११ मध्ये समावेश?

वॉशिंग्टन सुंदरला अजून वनडे सिरीजमधील कोणत्याही सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. तर अक्षर पटेलने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी दाखवलीये. तर आथा या तिसऱ्या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. अक्षर पटेलला एका सामन्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. याचा अर्थ असा की, भारतीय टीममध्ये तीन बदल दिसून येणार आहेत. जेणेकरून सर्व खेळाडूंना चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सामन्याचा वेळ मिळेल.

India vs England 3rd ODI Playing XI
Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियात घातक गोलंदाजाची एन्ट्री, बुमराहला संघाबाहेर ठेवण्याचं कारण आलं समोर

कशी आहे प्लेईंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, ऋषभ पंत, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, रवींद्र जडेजा, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com