IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन टीमला नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक

Gujarat Titans Team Ownership: आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मोठी उलथापालथ होणार आहे. २०२२ मध्ये चॅम्पियन बनणाऱ्या संघाला नवा संघमालक मिळणार आहे.
IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन्स टीम नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक
gt vs csksaam tv
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मोठी उलथापालथ होणार आहे. हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सोडल्यानंतर, ही जबाबदारी शुभमन गिलकडे सोपवण्यात आली होती.

आता कर्णधारानंतर गुजरात टायटन्सने मालकही बदलणार असल्याचं म्हटलं जात आहे. सीव्हीसी कॅपिटल्सने २०२१ मध्ये गुजरात टायटन्स संघ खरेदी केला होता. मात्र आता अहमदाबादची टोरेंट कंपनी या फ्रँचायजीचे मालकी हक्क मिळवण्याच्या उंबरठ्यावर आहे.

IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन्स टीम नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक
IND vs ENG: तिसऱ्या वनडेत ३ बदल निश्चित? कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११?

टोरेंट समूह या फ्रेंचायझीचा बहुतांश हिस्सा खरेदी करणार असल्याचं म्हटलं जात आहे. espncricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, आतापर्यंत सीव्हीसी कॅपिटलकडे मालकी हक्क असलेला गुजरात टायटन्स संघाचा ६७ टक्के हिस्सा टोरेंट कंपनी खरेदी करणार आहे.

आयपीएल कमिटीकडून अजूनही अंतिम मंजूरी मिळालेली नाही. मंजूरी मिळाल्यानंतर, २१ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०२५ स्पर्धेत टोरेंट समूह गुजरात टायटन्स संघाचे नवे मालक असतील.

IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन्स टीम नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक
IPL 2025 Schedule: या दिवशी जाहीर होणार IPL चे वेळापत्रक! फायनल कुठे होणार? वाचा लेटेस्ट अपडेट

आयपीएल २०२१ पूर्वी बीसीसीआयने गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स हे २ फ्रेंचायझी विकण्यासाठी काढल्या होत्या. त्यावेळी सीव्हीसी कॅपिटलने सर्वाधिक ५६२५ कोटी रुपये मोजून गुजरात टायटन्स फ्रेंचायझी खरेदी केली होती. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळताना या फ्रेंचायझीने पहिल्याच हंगामात जेतेपदाला गवसणी घातली होती.

या लिलावात टोरेंट समूहाने देखील गुजरात फ्रेंचायझीसाठी बोली लावली होती. मात्र त्यांना मालकी हक्क मिळवता आले नव्हते. टोरेंट समूहाने अहमदाबादसाठी ४६५३ कोटी आणि लखनौसाठी ४३५६ कोटी रुपये मोजले होते.

IPL 2025: IPL आधी मोठा उलटफेर! या चॅम्पियन्स टीम नव्या कर्णधारानंतर मिळणार नवा संघमालक
IND vs ENG: बॉलर आहे की बॉलिंग मशिन? जडेजाने अवघ्या इतक्या सेकंदात संपवली १ ओव्हर

टोरेंट समूहाचे एकूण मुल्यांकन ४१, ००० कोटी रुपये इतके असल्याची माहिती कंपनीच्या सांकेतिक स्थळावरुन मिळाली आहे. ही भारतातील अव्वल मल्टीनॅशनल कंपनीपैकी एक आहे. तर गुजरात टायटन्स संघाबद्दल बोलायचं झालं, त या संघाचे कर्णधारपद शुभमन गिलकडे आहे. यासह या संघात जोस बटलर, मोहम्मद सिराज, आणि राशिद खानसारखे दिग्गज खेळाडू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com