अहमदाबादच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना पार पडला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने ५० षटकअखेर ३५६ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडलाही चांगली सुरुवात मिळाली होती. दरम्यान धावांचा पाठलाग करताना सलामीवीर बेन डकेटने सुरुवातीला चौकारांची रांग लावली. त्यानंतर अर्शदीपने त्याला बाद करत माघारी धाडलं.
टी-२० क्रिकेटमध्ये शानदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीप सिंगला रोहितने वनडे सामन्यासाठी प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं. मात्र त्याला हवी तशी सुरुवात करता आली नाही. कारण सुरुवातीला इंग्लंडच्या सलामी जोडीने अर्शदीप सिंगवर चांगलाच हल्ला चढवला. सुरुवातीला फलंदाजी करताना बेन डकेटने गिलच्या षटकात लागोपाठ ४ चौकार खेचले.
अर्शदीप सिंगने टाकलेला प्रत्येक चेंडू डकेट मैदानाबाहेर पोहोचवण्याच्या प्रयत्नात होता. मात्र रोहितच्या मास्टरमाईंडमुळे त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं. भारतीय संघाकडून ७ वे षटक टाकण्यासाठी अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला होता. या षटकातील दुसरा चेंडू अर्शदीप सिंगने स्लोवर टाकला.
ऑफ साईडच्या बाहेर टाकलेल्या या चेंडूवर डकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा हा प्रयत्न फसला. चेंडू सरळ मिड ऑफला क्षेत्ररक्षण करत असलेल्या रोहित शर्माच्या हातात गेला. रोहितने कुठलीही चूक न करता सोपा झेल घेतला. दरम्यान झेल घेतल्यानंतर त्याने मास्टरमाईंडसारखा इशाराही केला. रोहितने गिलला स्लोव्हर चेंडू टाकण्याचा इशारा केला असावा.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ३५६ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून गिलने सर्वाधिक ११२ धावांची खेळी केली. तर विराटने ५२, श्रेयस अय्यरने ७८ आणि केएल राहुलने ४० धावांची खेळी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.