vishakapattanam cricket ground yandex
Sports

IND vs ENG 2nd Test: दुसऱ्या कसोटीत गोलंदाजांची होणार चांदी की फलंदाज पाडणार धावांचा पाऊस? खेळपट्टीबाबत अजूनही सस्पेंस

India vs England 2nd Test Pitch Report: दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की गोलंदाजांना मदत मिळणार? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.

Ankush Dhavre

India vs England 2nd Test Pitch Report:

भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाले आहेत. मालिकेतील दुसरा कसोटी सामना २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टनमच्या मैदानावर रंगणार आहे. पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात फिरकी गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला होता. आता दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी फलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार की गोलंदाजांना मदत मिळणार? याबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. (IND vs ENG 2nd Test Pitch Report)

कशी असेल विशाखापट्टनची खेळपट्टी?

विशाखापट्टनमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणार यात काहीच शंका नाही. मात्र चेंडू पहिल्या दिवसापासूनच फिरणार का?यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, खेळपट्टीबाबत भविष्यवाणी करणं जरा कठीण आहे. या खेळपट्टीवर दुसऱ्या दिवसापासून चेंडू फिरु शकतो. (Cricket news in marathi)

या मैदानावर खेळल्या गेलेल्या गेल्या २ सामन्यांचा रेकॉर्ड पाहिला तर, फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. भारतीय संघाने गेल्या दोन्ही सामन्यांमध्ये बाजी मारली आहे. २०१६ मध्ये याच मैदानावर भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर २४६ धावांनी विजय मिळवला होता.

या सामन्यात विराट कोहलीने दोन्ही डावात मिळून २४८ धावा चोपल्या होत्या. त्यानंतर पुढील सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. २०१९ मध्ये झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने २०३ धावांनी विजय मिळवला होता. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना रोहित शर्माने पहिल्या डावात १७६ तर दुसऱ्या डावात १२७ धावांची खेळी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dabeli Bhaji Recipe : दाबेलीसाठी परफेक्ट भाजी कशी बनवाल? वाचा सीक्रेट रेसिपी

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

SCROLL FOR NEXT