yashasvi jaiswal twitter
Sports

IND vs ENG 2nd Test, Day 2: एकटा जयस्वाल इंग्लिश गोलंदाजांना पुरून उरला! टीम इंडियाने उभारला धावांचा डोंगर

India vs England 2nd Test, Day 2: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 2nd Test,Day 2:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनममध्ये सुरु आहे. या सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव ३९६ धावांवर संपुष्टात आला आहे.

पहिल्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघाने ६ गडी बाद ३३६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात भारतीय संघाचा डाव आटोपला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना यशस्वी जयस्वालने सर्वाधिक २०९ धावांची खेळी केली.

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला यशस्वी जयस्वाल आणि आर अश्विन ही जोडी मैदानावर आली होती. १०१ व्या षटकात जेम्स अँडरसनने आर अश्विनला २० धावांवर बाद करत माघारी धाडलं. त्यानंतर यशस्वी जयस्वालने षटकार आणि चौकार मारुन आपलं द्विशतक पूर्ण केली. जयस्वाल या डावात २०९ धावा करत माघारी परतला. जसप्रीत बुमराह ६ तर मुकेश कुमार शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

तसेच इंग्लंडच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर जेम्स अँडरसनने दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच भारतीय संघाला मोठे धक्के दिले. त्याने २५ षटकं गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने ४७ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर फिरकी गोलंदाज शोएब बशीर आणि रेहान अहमद या जोडीने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले. (Cricket news in marathi)

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी मैदानावर आली होती. रोहित शर्मा अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. तर गिलने ३४, श्रेयस अय्यर २७, रजत पाटीदार ३२, अक्षर पटेल २७, केएस भरत १७, आर अश्विनने २० धावा केल्या. दरम्यान भारतीय संघाचा संपूर्ण डाव ३९६ धावांवर आटोपला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT