team india twitter
Sports

IND vs ENG 2nd ODI: इंग्लंडचा खेळ खल्लास! भारताला जिंकण्यासाठी इतक्या धावांचं आव्हान

India vs England 2nd ODI, 1st Inning Highlights: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना कटकमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात मुंबईने शानदार विजयाची नोंद केली होती. मालिकेतील दुसरा सामना कटकच्या मैदानावर सुरु आहे.

या सामन्यातही इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला ४९.५ षटकअखेर ३०४ धावा करता आल्या आहेत. तर भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ३०५ धावा करायच्या आहेत.

इंग्लंडची दमदार सुरुवात

या सामन्यात इंग्लंडकडून डावाची सुरुवात करण्यासाठी फिल सॉल्ट आणि बेन डकेट ही जोडी मैदानावर आली होती. या दोघांनी मिळून ८१ धावांची भाागीदारी केली. दोघांनी सुरुवातीच्या काही षटकात दमदार फटकेबाजी केली. फिल सॉल्टने २६ धावांची खेळी केली. तर बेन डकेटने ६६ धावा केल्या. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रुटने सर्वाधिक ६९ धावांची खेळी केली. तर हॅरी ब्रुक ३१ धावा करत माघारी परतला. कर्णधार जोस बटलरने ३४ धावा केल्या.

भारतीय गोलंदाजांची कसून गोलंदाजी

या सामन्यात वरुण चक्रवर्तीला पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याला या सामन्यात १ गडी बाद करता आला. भारतीय संघाकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर मोहम्मद शमी, हर्षित राणा, हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, शुभमन गिल (उपकर्णधार), लोकेश राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, वरूण चक्रवर्ती, मोहम्मद शमी

भारताकडे मालिका जिंकण्यासची संधी

भारतीय संघाने यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत इंग्लंडला ४-१ ने धूळ चारली होती. आता ३ वनडे सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या मैदानावर पार पडला होता. या सामन्यात भारताने ४ गडी राखून विजय मिळवला होता. आता दुसरा सामना जिंकून भारतीय संघाला या मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack Prevention: हार्ट अटॅक अन् स्ट्रोक 'या' चुकींमुळे होतो, उपाय वेळीच जाणून घ्या, नाहीतर...

Maharashtra Live News Update : - मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

Diwali Lucky Rashi: दिवाळीत 'या' राशींची होणार चांदी, खिशा पैशांनी भरणार

१८६ महागड्या कार खरेदी करत २१ कोटी रुपयांची बचत, गुजरातमध्ये जैन समाजाने लढवली अजब शक्कल; प्रकरण काय?

Online Shopping: चुकूनही या 3 वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका , पैसे जातील वाया

SCROLL FOR NEXT