team india twitter
Sports

IND vs ENG: बॉलर आहे की बॉलिंग मशिन? जडेजाने अवघ्या इतक्या सेकंदात संपवली १ ओव्हर

Ravindra Jadeja Bowled Over In Just 73 Seconds: भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने अवघ्या ७३ सेकंदात षटक पूर्ण केलं. ज्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

भारतीय संघाविरुद्ध झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. हा निर्णय इंग्लंडच्या फलंदाजांनी सार्थ ठरवत ३०० चा आकडा गाठला.

मात्र इंग्लंडचा संघ स्वतःला ऑलआऊट होण्यापासून वाचवू शकला नाही. भारताकडून रविंद्र जडेजा पुन्हा एकदा हुकमी एक्का ठरला. जडेजाने शानदार गोलंदाजी करून इंग्लडच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. यादरम्यान त्याने असा काही कारनामा करून दाखवला, ज्याचा कोणी विचारही केला नसेल.

जडेजा वेगवान षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध आहे. तो फलंदाजांना सेट होण्यासाठी फार वेळ घेऊ देत नाही. इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तर त्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. एक षटक पूर्ण करण्यासाठी त्याने ७३ सेकंदाचा अवधी घेतला. भारतीय संघाकडून २४ वे षटक टाकण्यासाठी जडेजा गोलंदाजीला आला.

ज्यावेळी जडेजा गोलंदाजी करत होता. त्यावेळी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक फलंदाजी करत होता. लाईव्ह स्ट्रिमिंगनुसार जडेजाने हे षटक अवघ्या ७३ सेंकदात संपवलं. हे पाहून समालोचकांनाही धक्का बसला. सोशल मीडियावरही नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

जडेजाच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर या डावात गोलंदाजी करताना त्याने इंग्लंडच्या ३ फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. त्याने बेन डकेटला ६५ धावांवर तंबूत धाडलं. तर रुटला ६९ धावांवर बाद केलं.

त्यानंतर जेमी ओवर्टनला त्याने अवघ्या ६ धावांवर पॅव्हेलियनची वाट दाखवली. यासह तो इंग्लंडविरुद्ध खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.

भारताचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा डाव ३०४ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने शानदार ११९ धावांची खेळी केली.

तर शुभमन गिलने ६० धावांची खेळी केली. त्यानंतर श्रेयस अय्यरने ४४ आणि शेवटी अक्षर पटेलने ४१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासह भारताने या मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

Maharashtra Live News Update: पुणे जिल्ह्याला आज येलो अलर्ट

Mumbai Crime News: मालाडमध्ये बार डान्सरची हत्या; नको त्या अवस्थेत सापडला मृतदेह, नेमकं प्रकरण काय?

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

SCROLL FOR NEXT