team india saam tv news
Sports

IND vs ENG 1st Test: जडेजा,राहुल अन् जयस्वालची 'यशस्वी' अर्धशतकं! पहिल्या डावात टीम इंडियाची इंग्लंडवर मोठी आघाडी

IND vs ENG 1st Test Day 3 LIVE: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

IND vs ENG 1st Test Day 3 LIVE Updates:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना हैदराबादच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा डाव ४३६ धावांवर संपुष्टात आला आहे. यासह भारतीय संघाने इंग्लंडवर १९० धावांची भलीमोठी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघाने घेतली मोठी आघाडी..

या सामन्यात भारतीय फलंदाजांनी दमदार खेळ करत इंग्लंडच्या गोलंदाजांना पूर्णपणे बॅकफुटवर ठेवलं. या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची जोडी मैदानारवर आली होती. रोहित अवघ्या २४ धावा करत माघारी परतला. तर दुसरीकडे जयस्वालने डाव सांभाळत ८० धावांची खेळी केली. (cricket news in marathi)

जयस्वालचं शतक २० धावांनी हुकलं. त्यानंतर केएल राहुलने १२३ चेंडूंचा सामना करत ८६ धावांची खेळी केली. राहुलचं शतकही अवघ्या १४ धावांनी हुकलं. शेवटी जडेजा आणि अक्षर पटेलने संघासाठी बहुमुल्य योगदान दिलं. जडेजाने ८७ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेल ४४ धावा करत माघारी परतला.

इंग्लंडकडून गोलंदाजी करताना जो रूटने सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर टॉम हार्टले आणि रेहान अहमदने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर जॅक लिचने एक गडी बाद केला.

इंग्लंडने केल्या २४६ धावा..

इंग्लंडचा बॅझबॉल या डावात कामी आला नाही. कारण इंग्लंडला या डावात मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. इंग्लंडकडून फलंदाजी करताना बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची तुफानी खेळी केली. तर बेन डकेटने ३५, जॉनी बेअरस्टोने ३७, जो रुटने २९ धावांची खेळी केली. या डावात इंग्लंडचा डाव अवघ्या २४६ धावांवर संपुष्टात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death : काम करण्याची वेगळी आणि शिस्तबद्ध शैली होती; अजित पवारांच्या निधनानंतर प्रकाश आंबेडकरांची भावुक पोस्ट

अजितदादांच्या विमानाचं टेकऑफ ते अपघात...नेमकं काय घडलं ?

Ajit Pawar Death: अजित पवारांचे 'ते' ५ मोठे निर्णय; धडाडी निर्णयांनी बदलली महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

नजर जाईल तिथपर्यंत कार्यकर्त्यांची अलोट गर्दी, अजित पवारांच्या अंत्यदर्शनासाठी जमला जनसमुदाय|VIDEO

Thursday Horoscope : जुन्या चुकांमधून धडा घ्यावा लागेल; ५ राशींच्या लोकांना जपून निर्णय घ्यावे लागेल

SCROLL FOR NEXT