team india twitter
Sports

IND vs ENG, Weather Update: भारत- इंग्लंड पहिला सामना रद्द होणार? काय आहे कारण

India vs England Weather Update: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या सामन्यादरम्यान कसं असेल हवामान? जाणून घ्या.

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. दोन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघ आहेत.

त्यामुळे दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येणार तेव्हा क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळतो. दरम्यान २२ जानेवारीला कोलकात्यातील हवामान कसं असेल? जाणून घ्या.

कसं असेल हवामान?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला टी-२० सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. हा सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. सामन्यावेळी अधिकतम तापमान २७ अंश सेल्सिअस इतकं असेल. तर किमान तापमान १६ डिग्री सेल्सिअस इतकं असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हा सामना जानेवारी महिन्यात होतोय. या महिन्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना पावसाच्या अडथळ्याशिवाय २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ २४ वेळेस आमनेसामने आले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १३ सामने जिंकले आहेत. तर इंग्लंडला ११ सामने जिंकता आले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचं पारडं जड राहिलं आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत . त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळेल.

इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उप कर्णधार), रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक) आणि रवि बिश्नोई.

असा आहे इंग्लंडचा संघ:

जोस बटलर (कर्णधार), बेन डकेट, जेमी ओवरटन, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टन, आदिल रशीद, साकिब महमूद, जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, फिल साल्ट, मार्क वुड, रेहान अहमद, जोफ्रा आर्चर आणि गस एटकिंसन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lucky zodiac signs: शनिवारी कार्तिक चतुर्थी! व्यवहार, चर्चा आणि निर्णयांसाठी अनुकूल दिवस; 4 राशींवर विशेष कृपा

शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे, सुविधा केंद्र, बीबीएफ यंत्रासाठी अनुदान मिळणार; कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंना मोठा धक्का; निष्ठावंत नेत्यानं सोडली साथ

Maharashtra Live News Update: मुद्रांक शुल्क आणि त्यावरचा दंड भरल्यावरच व्यवहार पूर्णपणे रद्द होणार

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट? एक-दोन नव्हे, तीन-तीन प्लान आले समोर

SCROLL FOR NEXT