
कसोटी सामन्यांचा थरार संपल्यानंतर आता भारतीय संघ टी-२० मालिकेसाठी सज्ज झाला आहे. इंग्लंडचा संघ टी-२० मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.
मालिकेतील पहिल्या सामन्याचा थरार कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. इंग्लंड संघाची धूरा जोस बटलरच्या हाती असणार आहे. तर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. दरम्यान या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११? जाणून घ्या.
दोन्ही संघांचा गेल्या ५ सामन्यातील रेकॉर्ड पाहिला, तर भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे. गेल्या ५ पैकी ३ सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवता आला आहे. तर २ सामन्यांमध्ये इंग्लंडने बाजी मारली आहे.
भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडचा सामना करताना दिसून आला होता. या सामन्यात भारतीय संघाने ६८ धावांनी शानदार विजय मिळवला होता. त्यामुळे नक्कीच भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला असणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंडची बॅटींग लाईनअप देखील तगडी आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये जोरदार लढत पाहायला मिळू शकते.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या मालिकेतून कमबॅक करताना दिसून येणार आहे. त्यामुळे तो कशी कामगिरी करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार कामिगिरी करुन आलेला नितीश कुमार रेड्डी देखील मैदानात उतरणार आहे.
अक्षर पटेलकडे या मालिकेत उप कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर संजू सॅमसन आणि तिलक वर्मावर देखील साऱ्यांच्या नजरा असणार आहेत.
इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या टी-२० सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११?
संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.
इंग्लंडची प्लेइंग ११:
जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, हॅरी ब्रुक, ब्रायडन कार्स, जेमी स्मिथ, लियाम लिविंगस्टन, फिल सॉल्ट, बेन डकेट साकिब महमूद, मार्क वुड, जोफ्रा आर्चर
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.