India vs Bangladesh, Virender Sehwag Tweet/BCCI SAAM TV
Sports

Ind vs Ban : भारताच्या पराभवानंतर विरेंद्र सेहवागचा खोचक टोला; नेटकरी म्हणाले, सर आता तुम्हीच या!

बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर टीम इंडियावर विरेंद्र सेहवागनं निशाणा साधला आहे.

Nandkumar Joshi

Virender Sehwag On Team India: भारतीय संघाला बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात पाच धावांनी पराभव पत्करावा लागला. या पराभवासह टीम इंडियानं मालिकाही गमावली आहे. बांगलादेश दौऱ्यात वनडे मालिका गमावल्यानंतर भारतीय संघावर टीका होऊ लागली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग बेधडक वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या पराभवानंतर त्यानं खास शैलीत टीम इंडियावर टीकास्त्र डागलं आहे. (Cricket News)

भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागनं त्याच्या खास शैलीत टीम इंडियाला टोला लगावला आहे. सेहवागनं ट्विट केलं आहे. ते प्रचंड व्हायरल होत आहे. क्रिप्टोजपेक्षा अधिक जोरानं आपला परफॉर्मन्स आपटत आहे. आता जागे होण्याची आणि विचार करण्याची वेळ आली आहे, असं सेहवागनं ट्विटमध्ये म्हटलं आहे. बांगलादेशच्या विरोधात मालिका सुरू होण्याआधी भारताचा न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतही ०-१ ने पराभव झाला होता. तर दुसरीकडे दुखापतग्रस्त खेळाडूंनी संघाचं टेन्शन वाढवलं आहे. त्यावरही विरेंद्र सेहवागनं कडक टोला लगावला आहे.

टीम इंडियाची कामगिरी निराशाजनक

२०२२ या वर्षात टीम इंडियानं निराशाजनक कामगिरी केली आहे. टीम इंडिया आशिया चषक स्पर्धेतही सुपर ४ फेरीत पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून पराभूत झाली होती. तर टी २० वर्ल्डकपमध्ये सेमिफायनलमध्ये भारताला इंग्लंडकडून १० विकेटनं पराभूत व्हावं लागलं होतं. ऐनवेळी टीम इंडियाच्या स्टार फलंदाजांनी कच खाल्ली आणि पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. फलंदाजांच्या हाराकिरीमुळं टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं होतं. (Rohit Sharma)

वर्ल्डकपच्या तयारीवर प्रश्नचिन्ह

वनडे वर्ल्डकप २०२३ ही स्पर्धा भारतात होणार आहे. भारतीय संघ आतापासूनच तयारीला लागला आहे. मात्र, केएल राहुल, विराट कोहली, शिखर धवन यांचा खराब फॉर्म हा चिंतेचा विषय झाला आहे. टीम इंडियानं महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात २०११ मध्ये वर्ल्डकप स्पर्धेचे विजेतेपद जिंकलं होतं. पण सध्याची टीम इंडियाची कामगिरी आणि एकूणच खेळाडूंचा फॉर्म बघता पुढील वर्षी होणारी वर्ल्डकप स्पर्धा जिंकणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

Maharashtra Live News Update : वाशिम जिल्ह्यात जोरदार पाऊस, पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Pune Crime : कोंढवा तरुणी अत्याचार प्रकरणात पुन्हा ३६० डिग्री टर्न, आरोप असलेल्या तरुणाला अटकच नाही

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT