भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी अतिशय महत्वाची असणार आहे.
या मालिकेत विराट कोहली आणि रोहित शर्मासारखे खेळाडू देखील खेळताना दिसणार आहेत. मात्र एक खेळाडू असा आहे, जो बांगलादेशवर एकटा भारी पडू शकतो. कोण आहे तो खेळाडू? जाणून घ्या.
भारताचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल कसोटी मालिकेत बांगलादेशी गोलंदाजांचा घाम काढू शकतो. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोघे अनुभवी असले तरीदेखील यशस्वी जयस्वालच्या आक्रमणासमोर बांगलादेशचे गोलंदाज अडचणीत येऊ शकतात.
सलामीला फलंदाजी जाण्यासाठी येणाऱ्या यशस्वीने २०२४ वर्षात भारतीय संघांसाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. कसोटी दुहेरी शतकही झळकावलं आहे. त्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजांना सावध राहावं लागणार आहे.
ज्यावेळी वीरेंद्र सेहवाग भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करायचा, त्यावेळी तो देखील सुरुवातीपासूनच गोलंदाजांवर हल्लाबोल करायचा. यशस्वी जयस्वालमध्येही अशीच काहीशी क्षमता आहे. तो बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगली धुलाई करू शकतो.
यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड पाहिला तर, त्याने आतापर्यंत खेळलेल्या ९ कसोटी सामन्यांमध्ये ६८.५३ च्या सरासरीने १०२८ धावा केल्या आहेत. ज्यात २ दुहेरी शतक, ३ शतक आणि ४ अर्धशतकांची नोंद आहे.
याच वर्षी इंग्लंडचा संघ भारतात आला होता, त्यावेळी यशस्वी जयस्वालची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने याच संघाविरुद्ध खेळताना २ दुहेरी शतकं झळकावली होती. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याने सर्वाधिक ७१४ धावा केल्या होत्या.
यादरम्यान त्याने ८०,१५,२०९, १७,१०,२१४,७३,६७,३७ आणि २७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे भारतात खेळताना बांगलादेशला यशस्वी जयस्वालपासून सावध राहावं लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.