India Vs Bangladesh, Rohit Sharma/BCCI Twitter SAAM TV
Sports

Rohit Sharma Update : ४ सामने, ४७० धावा...शतकांची हॅट्ट्र्रिक; खतरनाक फलंदाज घेणार रोहित शर्माची जागा

India vs Bangladesh : रोहित शर्माला दुखापत झाल्यानं बांगलादेश दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. त्याच्या जागी विस्फोटक फलंदाजाला टीम इंडियात सलामीवीर म्हणून संंधी मिळू शकते.

Nandkumar Joshi

India vs Bangladesh, Rohit Sharma Update : बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाची कामगिरी आतापर्यंत तरी निराशाजनक राहिली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं दोन्ही वनडेत सपाटून मार खाल्ला आहे. दोन्ही सामन्यांत पराभूत झाल्यानंतर टीम इंडियानं मालिकाही गमावली आहे.

दुसरीकडे या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यानं बांगलादेश दौऱ्यातूनही बाहेर झाला आहे. आता रोहित शर्मा उर्वरित वनडे सामना आणि कसोटी मालिकाही खेळू शकणार नाही. त्याच्या जागी एका विस्फोटक युवा खेळाडूला संधी मिळू शकते. (Rohit Sharma)

रोहित शर्मा दुखापतीमुळं यापुढील सामन्यांत टीम इंडियात नसेल. त्याच्या जागी अभिमन्यू इश्वरन या धाकड फलंदाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यानं बांगलादेश ए विरुद्ध सलग दोन सामन्यांत दोन शतके केली आहेत. पीटीआयच्या वृत्तानुसार, अभिमन्यू रोहित शर्माची जागा घेणार हे जवळजवळ निश्चित मानलं जात आहे. (Sports News)

बांगलादेश ए विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार आहे. यात त्यानं सलग दोन शतके केली आहेत. अभिमन्यूनं पहिल्या सामन्यात १४१ धावा आणि दुसऱ्या सामन्यात १५७ धावा केल्या आहेत. अभिमन्यू रोहितप्रमाणं सलामीला खेळतो. त्यामुळं रोहितनंतर अभिमन्यूचं नाव आघाडीवर आहे.

अभिमन्यू जबरदस्त फॉर्मात

अभिमन्यू इश्वरन हा सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. त्यानं सलग तीन सामन्यांत तीन शतके ठोकली आहेत. बांगलादेश ए विरुद्ध दोन शतके आणि त्याआधी विजय हजारे करंडक स्पर्धेतही शतकी खेळी साकारली होती. त्याआधी अभिमन्यूनं रेल्वेविरुद्ध खेळताना अर्धशतकी खेळी केली होती. गेल्या चार डावांत अभिमन्यूनं ४९८ धावा कुटल्या आहेत. अशावेळी टीम इंडियात त्याला संधी मिळाली तर तो नक्कीच टीम इंडियासाठी फायदेशीर ठरेल, असे बोलले जात आहे.

उमरान मलिक, मुकेश कुमार शर्यतीत

पीटीआयच्या वृत्तानुसार, बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांनाही बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळं कसोटी मालिकेत खेळू शकणार नाही. त्यामुळे मुकेश कुमार आणि उमरान मलिक यांच्यापैकी एकाला टीम इंडियात संधी मिळेल.

मुकेश कुमार सध्या टीम इंडिया ए साठी बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. बांगलादेश ए विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मुकेशनं सहा विकेट घेतल्या आहेत. त्यामुळं त्याला संधी दिली जातेय का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyber Crime : चांगला नफा मिळविण्यासाठी गुंतवणूक करणे पडले महागात; कोट्यवधी रुपयांचा गंडा

Sonam Kapoor: अभिनेत्री सोनम कपूर ४०व्या वर्षी पुन्हा होणार आई; लवकरच देणार चाहत्यांना खूशखबर...!

Post Office Scheme: फक्त व्याजावर 12 लाख कमाई! पोस्ट ऑफिसची ही जबरदस्त योजना तुम्ही पाहिली का?

Maharashtra Crop Inspection : शेतकऱ्यासाठी महत्त्वाचा निर्णय, प्रत्येक गावात होणार पीक पाहणी, चंद्रशेखर बावनकुळेंचा आदेश

Beed : जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यासाठी नारायण गडावर जय्यत तयारी | VIDEO

SCROLL FOR NEXT