Rohit Sharma : रोहित शर्माला गंभीर दुखापत, थेट हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, मैदानात नेमकं काय घडलं?

भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्माला दुखापत झाली. त्यावेळी नेमकं काय घडलं? वाचा
India vs Bangladesh Live Match Update Rohit Sharma/BCCI
India vs Bangladesh Live Match Update Rohit Sharma/BCCISAAM TV

Rohit Sharma Update News : भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यादरम्यान गंभीर दुखापत झाली. रोहित शर्माला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. रोहित शर्माला रुग्णालयात का जावं लागलं. मैदानात असं काय घडलं?असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट चाहत्याला पडला आहे. (Rohit Sharma)

दुसरं षटक अन् क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्लिपमध्ये झेल पकडण्याच्या प्रयत्नात हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. जखम झाल्यानं रोहितच्या हातातून रक्तस्राव होऊ लागला. रोहित शर्माला एक्सरे काढण्यासाठी ढाकाच्या रुग्णालयात नेण्यात आलं. रोहित शर्मा बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात स्लिपमध्ये फिल्डिंग करताना दुसऱ्या षटकातच ही घटना घडली. (Sports News)

India vs Bangladesh Live Match Update Rohit Sharma/BCCI
Rohit Sharma - Virat Kohli : रोहित शर्मा, विराट कोहलीला टी २० मधून मिळणार डच्चू? BCCI चा प्लान समोर?

रोहितच्या हातातून रक्तस्राव

बांगलादेशच्या डावातील दुसरं षटक मोहम्मद सिराज टाकत होता. रोहित शर्मा हा स्लिपमध्ये फिल्डिंग करत होता. या षटकात बांगलादेशचा सलामी फलंदाज अनामुल हक स्ट्राइकवर होता. सिराजनं फेकलेला वेगवान चेंडू बॅटची कड लागून स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात पोहोचला. रोहित शर्मानं झेल पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चेंडू त्याच्या हाताच्या अंगठ्यावर लागला. त्याच्या अंगठ्यातून रक्तस्राव होऊ लागला.

India vs Bangladesh Live Match Update Rohit Sharma/BCCI
Cricket News : रोहित शर्मा पुढच्या सामन्यांत खेळणार? फिटनेसबाबत आली मोठी अपडेट

रोहित शर्मा थेट रुग्णालयात

रोहित शर्माला तात्काळ मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्यानंतर रोहित शर्माला अंगठ्याचा स्कॅन करण्यासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलं. रोहित शर्माची दुखापत किरकोळ असू दे, अन्यथा वनडे आणि कसोटी मालिकेतूनही बाहेर व्हावे लागेल, तो पुन्हा मैदानात येऊ दे, अशी प्रार्थना आता त्याचे चाहते करत आहेत. रोहित शर्माच्या जागी रजत पाटीदार मैदानात फिल्डिंगसाठी आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com