India vs Bangladesh ODI and Test Series, Rohit Sharma / BCCI
India vs Bangladesh ODI and Test Series, Rohit Sharma / BCCI Saam TV
क्रीडा | IPL

Ind vs Ban : टीम इंडिया बांगलादेशला भिडणार; संपूर्ण वेळापत्रक, कधी-कुठे बघाल? जाणून घ्या डीटेल्स

Nandkumar Joshi

Team India in Bangladesh Tour : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर पोहोचला आहे. दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामने आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. टी २० वर्ल्डकप स्पर्धेनंतर टीम इंडिया न्यूझीलंडच्या दौऱ्यावर होती. त्या मालिकेत अनेक दिग्गजांना विश्रांती देण्यात आली होती.

रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल यांना विश्रांती दिली होती. या दौऱ्यात हे सर्व खेळाडू मैदानावर ताकद दाखवतील. पुढच्या वर्षी भारतात वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा होणार आहे. हा दौरा रंगीत तालीम मानली जात आहे. त्यामुळं बांगलादेश दौऱ्याचं महत्व ओळखून टीम इंडिया मैदानात संपूर्ण ताकदीने उतरेल यात शंकाच नाही.

रविवारपासून वनडे मालिका

भारत आणि बांगलादेश यांच्यात वनडे मालिका उद्यापासून सुरू होत आहे. ४ डिसेंबरला पहिला सामना होईल. ढाकाच्या शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर हा सामना होईल. ७ डिसेंबरला याच मैदानावर दुसरा सामना होईल. तर तिसरा सामना हा चटगाव येथे खेळवण्यात येईल.

भारतीय संघानं २०१५ मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरची वनडे मालिका खेळली होती. ती मालिका बांगलादेशात झाली होती. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला २-१ ने पराभूत व्हावं लागलं होतं. त्या मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये चार वनडे सामने झाले आहेत. या सर्व सामन्यांमध्ये टीम इंडियानं विजय मिळवला आहे.

१४ डिसेंबरपासून कसोटी मालिका

१४ डिसेंबरपासून चटगावमध्ये भारत वि. बांगलादेश कसोटी मालिकेतील पहिली लढत होईल. याच मालिकेतील दुसरा कसोटी सामना ढाका येथे २२ डिसेंबरपासून खेळवण्यात येईल. कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारतीय संघाला सर्व कसोटी सामने जिंकणे महत्वाचे आहे. त्यामुळं टीम इंडियासाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. (Latest Marathi News)

वनडे मालिकेचे वेळापत्रक, कुठे होणार सामना?

पहिला एकदिवसीय सामना ४ डिसेंबर रोजी होईल. ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियममध्ये तो खेळवण्यात येईल. सकाळी साडेअकरा वाजता हा सामना सुरू होईल.

दुसरा एकदिवसीय सामना याच मैदानावर ७ डिसेंबर रोजी होईल. सकाळी ११.३० वाजल्यापासून हा सामना सुरू होईल.

तिसरा एकदिवसीय सामना चटगाव येथील जहूर अहमद चौधरी स्टेडियममध्ये होईल. १० डिसेंबरला सकाळी साडेअकरा वाजता ही लढत सुरू होईल.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक कसे असेल?

पहिला कसोटी सामना १४ ते १८ डिसेंबर दरम्यान होईल. चटगावच्या मैदानात तो खेळवण्यात येईल. सकाळी नऊ वाजता सामन्याला सुरुवात होईल.

दुसरी कसोटी लढत २२ ते २६ डिसेंबर या कालावधीत होईल. चटगाव येथेच हा सामना खेळवण्यात येईल. सकाळी ९ वाजता सामना सुरू होईल. (Sports News)

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वाशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर , उमरान मलिक, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

बांगलादेश संघ -

लिटन दास (कर्णधार), अनामुल हक, शाकिब अल हसन, मुश्फिकुर रहीम, अफीफ हुसैन, यासिर अली, मेहदी हसन, मुस्तफिजुर रहमान, तस्कीन अहमद, हसन महमूद, एबादत हुसैन, नासुम अहमद, महमूदुल्लाह, नजमुल हुसैन शान्तो और नुरुल हसन सोहन.

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), रविचंद्रन अश्विन, केएस भरत (विकेटकीपर), शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमेश यादव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

Nashik Lok Sabha: शांतीगिरी महाराज निवडणूक लढण्यावर ठाम, नाशिकमध्ये महायुतीला घाम! गोडसेंच्या अडचणी वाढणार?

Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

SCROLL FOR NEXT