Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

Maharahstra Politics: ठाण्यात शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांना खासदारकीची संधी दिल्याने भाजप आमदार गणेश नाईक नाराज झाले होते. म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.
Maharahstra Politics: ठाण्यात महायुतीचा मार्ग सुकर, गणेश नाईकांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीसांना यश

ठाणे : भाजप आमदार गणेश नाईक आणि पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्यात देवेंद्र फडणवीस यांना यश आले आहे. नवी मुंबईत भविष्यात भाजपचे स्थान कमी होणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला उचित सन्मान दिला जाईल, असं आश्वासन देत फडणवीसांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर केलेत.

ठाण्यात शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांना खासदारकीची संधी दिल्याने भाजप आमदार गणेश नाईक नाराज झाले होते. म्हस्केंना उमेदवारी दिल्यानंतर भाजप आमदार गणेश नाईक आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. तिकडे महायुतीचे ज्येष्ठ नेते नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यावर ठाम होते. महायुतीचा धर्म आणि भाजप कार्यकर्त्यांची नाराजी अशा कोंडीत सापडलेल्या फडणवीसांनी यशस्वी मध्यस्थी करत भाजप कार्यकर्त्यांची नाराजी दूर केलीय. नाराज झालेले आमदार गणेश नाईक यांची नाराजी दूर करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतली.

या बैठकीत भाजप पदाधिकारीदेखील उपस्थित होते. नवी मुंबईत भविष्यात भाजपचे स्थान कमी होणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याला उचित सन्मान दिला जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्के यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. भाजप कार्यकर्ते उद्यापासून म्हस्के यांचा प्रचार करणार आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com