Special Report : कुलरची थंड थंड हवा ठरतेय जिवघेणी! 7 वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत

Special Report : घरातला कुलर का ठरतोय जिवघेणा? कुलरने 7 वर्षीय चिमुरडीचा अंत

अकोला शहरातील माजी नगरसेवक अमोल गोगे यांची 7 वर्षीय मुलगी युक्ती ही घरात खेळत असताना कूलरजवळ गेली. आणि कूलरमधील विजेचा धक्का लागल्याने या मुलीचा जागेवरच मृत्यू झाला आहे. युक्तीचे आईवडील व कुटुंबीय घरातच होते. मात्र, त्यांच्या लक्षात येईपर्यंत युक्तीचा मृत्यू झाला होता. युक्तीला विजेचा धक्का लागल्याची माहिती मिळताच कुटुंबीय व परिसरातील नागरिकांनी तिला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ही बातमी ऐकताच गोगे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान कूलरला असलेल्या बटनांची एक वायर कटून त्यामधील करंट कूलरच्या जाळीला लागला. संपूर्ण कूलरमधून विजेचा प्रवाह सुरू असतानाच युक्तीचा हात कूलरला लागला होता त्यातून ही दुर्घटना घडली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com