Ind Vs Ban : बांगलादेश संघाच्या ठिकऱ्या उडवणार, टीम इंडियात आला 'त्सुनामी' आणणारा गोलंदाज

Ind vs Ban ODI Series : मोहम्मद शमी टीम इंडियात नसला तरी काय झालं? हा 'धाकड' गोलंदाज उडवणार बांगलादेशची झोप.
Ind Vs Ban 1st ODI/File Photo
Ind Vs Ban 1st ODI/File PhotoSAAM TV

Ind Vs Ban 1st ODI : बांगलादेश विरुद्ध भारत उद्या म्हणजेच रविवारपासून वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. या सामन्याआधीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळं संघाबाहेर झाला. भारताचं टेन्शन वाढलं असलं तरी, बांगलादेशच्या ठिकऱ्या उडवणारा धाकड गोलंदाज टीम इंडियात आला आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी हा दुखापतीमुळं संघाबाहेर झाला आहे. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्याआधी सराव करताना त्याच्या खांद्याला दुखापत झालीय. सध्या तो बेंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या निरीक्षणाखाली आहे. तो सध्या वनडे मालिका खेळणार नाही. न्यूझीलंडविरुद्धच्या दौऱ्यात त्याला विश्रांती देण्यात आली होती. तो बांगलादेशविरुद्धची मालिका खेळणार होता. (Sports News)

Ind Vs Ban 1st ODI/File Photo
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेआधी टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का; दिग्गज खेळाडू संघाबाहेर

शमी संघाबाहेर गेला असला तरी, टीम इंडियाला चिंता करण्याचे कारण नाही. जम्मू एक्स्प्रेस म्हणून ओळखला जाणारा उमरान मलिक याला टीम इंडियात स्थान देण्यात आलं आहे. उमरान यानं न्यूझीलंड दौऱ्यात टीम इंडियासाठी पदार्पण केलं होतं. त्याने दोन डावांत तीन विकेट घेतल्या होत्या. त्यानं न्यूझीलंडविरुद्ध १५० किलोमीटर प्रतीतास वेगापेक्षा अधिक वेगानं गोलंदाजी केलीय. २३ वर्षीय मलिकला या मालिकेत घेतलं नव्हतं. मात्र, शमीला दुखापत झाल्यानं त्याच्या जागी मलिकला संधी दिली आहे. (Latest Marathi News)

Ind Vs Ban 1st ODI/File Photo
Ricky Ponting: लाईव्ह मॅचदरम्यान रिकी पाँटिंगची तब्येत अचानक बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल

शमी कसोटी मालिका खेळणार का?

मोहम्मद शमी हा वनडे मालिकेतून बाहेर झाला आहे. खांद्याला दुखापत झाल्यानं तो बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका खेळू शकणार नाही, असे सांगितले जात आहे. वनडे मालिकेनंतर १४ डिसेंबरपासून भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. दुसरीकडे टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्यासाठी भारताला पुढील सर्व कसोटी सामने जिंकणे गरजेचे आहे. अशावेळी शमीसारखा हुकमी एक्का संघात नसणं हे टीम इंडियासाठी चिंता वाढवणारी गोष्ट आहे.

बांगलादेश वनडेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, रिषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com