Abhishek Sharma and Kuldeep Yadav shine as India defeat Bangladesh to reach Asia Cup 2025 final. saam tv
Sports

India vs Bangladesh: आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताचा प्रवेश; अभिषेक शर्मा अन् कुलदीप समोर बांगलादेशनं नांगी टाकली

IND VS BAN: आशिया कपच्या सुपर ४ फेरीत बांगलादेशला हरवून भारताने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली. अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव हे संघाच्या विजयाचे हिरो ठरले.

Bharat Jadhav

  • भारताने बांगलादेशला ४१ धावांनी पराभूत केलं.

  • भारत १२व्यांदा आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला.

  • कुलदीप यादवने ३ बळी घेत शानदार गोलंदाजी केली.

आशिया कपच्या सुपर ४ फेरीत पाकिस्तानानंतर भारताने बांगलादेशलाही हरवलं. या विजयासह टीम इंडिया आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे. टीम इंडियाच्या विजयाचे हिरो अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव होते. अभिषेक शर्माने फलंदाजीत आणि गोलंदाजीत कुलदीपनं चमकदार कामगिरी केली. बांगलादेशविरुद्धचा सामना भारताने ४१ धावांनी जिंकला.

अभिषेक शर्माने फक्त ३७ चेंडूत ७५ धावा केल्या होत्या. तर कुलदीप यादवने ४ षटकांत १८ धावा देत ३ बळी घेतलं. भारतीय संघ आता २६ सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्ध शेवटचा सुपर ४ राउंड सामना खेळणार आहे.

गोलंदाजांनी जिंकवला सामना

तसे पाहिले तर टीम इंडियाची फलंदाजी मजबूत मानली जाते, परंतु आजचा सामना गोलंदाजांनीच जिंकवून दिला. जसप्रीत बुमराहने त्याच्या पहिल्याच षटकात ब्रेकथ्रू दिला, परंतु वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने मधल्या षटकांमध्ये विजयाची नोंदवला. गोलंदाजी करताना वरुण चक्रवर्तीने दोन आणि कुलदीप यादवने तीन विकेट घेतल्या. दोन्ही गोलंदाजांनी आठ षटकांत ४७ धावा देत बांगलादेशचे पाच गडी तंबूत पाठवले.

अभिषेक शर्माचा जलवा

अभिषेक शर्माने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत अनेकांना चकीत केलं. अभिषेकनं फलंदाजाने सलग दुसरे अर्धशतक झळकावत टीम इंडियाला २० षटकांत १६८ धावांपर्यंत पोहोचवण्यास मदत केली. कठीण खेळपट्टीवर जेथे इतर फलंदाजांना चौकार मारण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, तिथे अभिषेक शर्माने पाच षटकार आणि सहा चौकार लगावत २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT