Ind Vs Ban/BCCI-Twitter SAAM TV
क्रीडा

Ind Vs Ban : वाह रे अश्विन-अय्यर...टीम इंडिया टेस्टमध्ये पास; बांगलादेशच्या तोंडून हिरावला विजयाचा घास

Ind Vs Ban 2nd Test : श्रेयस अय्यर आणि आर अश्विन या दोघांनी चिवट फलंदाजी करत टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून दिला.

Nandkumar Joshi

Ind Vs Ban 2nd Test : श्रेयस अय्यर आणि आर अश्विन या दोघांनी चिवट फलंदाजी करत टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून दिला. या विजयासह टीम इंडियानं कसोटी मालिकेत २-० ने क्लीन स्वीप केला. अय्यर-अश्विननं बांगलादेशच्या तोंडातून विजयाचा घास हिरावून भारताला ३ विकेटनं विजय मिळवून दिला. आर अश्विन हा प्लेअर ऑफ द मॅच ठरला.

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली होती. दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून वनडे मालिकेतील पराभवाचा वचपा काढायच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी भारताच्या हातून हा सामना जवळजवळ निसटला होता. पण अश्विन आणि अय्यरनं डाव सावरला आणि दुसरी कसोटी लढत जिंकून मालिका विजय मिळवून दिला. (Sports News)

बांगलादेशनं भारतासमोर माफक असं १४५ धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज एकापाठोपाठ एक बाद झाले आणि भारताची अवस्था ७ बाद ७४ झाली होती. हा सामना भारत गमावणार असं वाटत असतानाच, श्रेयस अय्यर आणि आर अश्विन मैदानात खुट्टी टाकून उभे राहिले. या रोमहर्षक लढतीत एकेरी-दुहेरी धावा जमवून दोघांनी भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी ७१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. अश्विनने अत्यंत महत्वाच्या क्षणी ४२ धावा केल्या. तर अय्यर २८ धावांवर नाबाद राहिला.

भारतीय दिग्गजांना अपयश

बांगलादेशने भारतासमोर १४५ धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरादाखल भारतीय संघानं अखेरच्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अय्यर आणि अश्विनच्या भागीदारीच्या जोरावर विजय मिळवून दिला. चौथ्या दिवसाची सुरुवात झाली त्यावेळी भारताच्या ४ बाद ४५ धावा होत्या. अक्षर पटेलनंही २६ धावांची महत्वाची खेळी केली. मात्र, बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्याच सत्रात भारताला पराभवाकडे नेले. पण अय्यर हा भिंत बनून उभा राहिला. ती पार करणं बांगलादेशी गोलंदाजांना शक्य झालं नाही. (Team India)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Night Routine: रात्री झोपण्याआधी फक्त या २ गोष्टी करा, सकाळी प्रसन्न वाटेल

Maharashtra News Live Updates: आमदार राम सातपुते यांचे पोलिस ठाण्यासमोर आंदोलन

Maharashtra Election: प्रचाराच्या तोफा थंडावल्या; कोणी गाजवल्या कोणी वाजवल्या? राज्यभरात कोणत्या नेत्याच्या किती झाल्या सभा?

Anmol Bishnoi arrested : बाबा सिद्धिकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेत सापडला

Tiger Shroff Baaghi 4: टायगर श्रॅाफचा कधीही न पाहिलेला अवतार; खतरनाक लूक व्हायरल

SCROLL FOR NEXT