Ind vs Ban : बाद झाल्यानंतर विराट भडकला; शाकिबसह पंचांनी केली मध्यस्थी, नेमकं घडलं काय?

Virat Kohli Angry : भारत-बांगलादेश कसोटीदरम्यान विराट कोहली बाद झाल्यानंतर तो बांगलादेशी खेळाडूवर भडकला.
India Vs Bangladesh 2nd Test, Virat Kohli Latest Update
India Vs Bangladesh 2nd Test, Virat Kohli Latest UpdateSAAM TV
Published On

Ind vs Ban 2nd Test : बांगलादेशातील मीरपूरमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना रोमांचक स्थितीत पोहोचलाय. बांगलादेशने भारताला विजयासाठी १४५ धावांचं लक्ष्य दिलं. मात्र, टीम इंडियाची फलंदाजी दुसऱ्या डावात गडबडली. बांगलादेशच्या गोलंदाजांनी तिखट मारा केला. भारताच्या टॉप ४ फलंदाजांना तंबूत धाडलं.

माजी कर्णधार विराट कोहली तिसऱ्या दिवसाचा अखेरचा विकेट ठरला. एक धाव करून विराट माघारी परतला. त्याला मेहदी हसन मिराजनं टिपलं. त्याआधी कर्णधार केएल राहुल, चेतेश्वर पुजारा आणि शुबमन गिलही स्वस्तात बाद झाले होते. (Sports News)

India Vs Bangladesh 2nd Test, Virat Kohli Latest Update
Virat Kohli Video : चित्त्यासारखा चपळ, पण 3-3 कॅच सोडल्या; विराट कोहलीला झालंय काय?

बांगलादेशी खेळाडूसोबत भिडला

कोहली बाद झाल्यानंतर तो बांगलादेशी खेळाडूशी मैदानातच भिडला. बांगलादेशच्या तैजुल इस्लाम याने कोहली बाद झाल्यानंतर त्याच्याबद्दल काहीतरी अनुद्गार काढले. त्यावर कोहली भडकला. त्याच्या दिशेने कोहली पावलं टाकू लागला. पण बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन आणि दोन्ही पंचांनी कोहलीकडे येत मध्यस्थी करून विराट कोहलीला थांबवलं. त्यानंतर विराट शाकिबला काहीतरी सांगत असल्याचं दिसलं. त्यानंतर पंचांनी विराटला पव्हेलियनकडे जाण्यास सांगितलं. (Virat Kohli)

India Vs Bangladesh 2nd Test, Virat Kohli Latest Update
Sam Curran Latest : सॅम करननं गर्लफ्रेंडसोबत बघितला IPL लिलाव; म्हणाला, रात्रभर...

शाकिबनं तैजुलशी केली चर्चा

विराट कोहली तंबूत परतल्यानंतर बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याने फिरकीपटू तैजुल इस्लामशी चर्चा केली. शाकिब त्याला समजावत होता. विराट कोहलीनं २२ चेंडूंचा सामना करताना फक्त एक धाव केली. मेहदी हसनच्या गोलंदाजीवर मोमिनुल हकने त्याचा झेल टिपला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com