IND vs BAN 3rd T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. मालिकेतील तिसरा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडला. हे मैदान हाय स्कोरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध आहे.
ही परंपरा कायम ठेवत, भारतीय संघाने टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली. संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याच्या फटकेबाजीच्या बळावर भारतीय संघाने २९७ धावांचा डोंगर उभारला.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेश १६४ धावा करता आल्या. यासह भारतीय संघाने हा सामना १३३ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान सूर्यकुमार यादवच्या नावे एका मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
भारतीय संघाने या सामन्यात बांगलादेशसमोर २९८ धावांचं भलंमोठं आव्हान ठेवलं होतं. फलंदाजांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर गोलंदाजांनीही धावांचा यशस्वी बचाव केला. बांगलादेशला १६४ धावांपर्यंत मजल मारता आली. हा भारताचा तिसरा सर्वात मोठा विजय ठरला आहे. यासह हा भारतीय संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सलग १० वा विजय ठरला आहे.
१६८ धावा- विरुद्ध न्यूझीलंड,२०२३
१४३ धावा - विरुद्ध आयर्लंड, २०१८
१३३ धावा- विरुद्ध बांगलादेश, २०२४
१०६ धावा, दक्षिण आफ्रिका, २०२३
१०१ धावा, विरुद्ध अफगाणिस्तान, २०२२
१०० धावा, विरुद्ध झिम्बाब्वे, २०२४
रोहित शर्मा- ६ वेळेस
सूर्यकुमार यादव- २ वेळेस
विराट कोहली- २ वेळेस
एमएस धोनी - १ वेळेस
रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर, सूर्यकुमार यादवकडे भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. याआधीही त्याने टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं.
भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्याने आतापर्यंत २ मालिकांमध्ये व्हॉईट वॉश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका १-१ च्या फरकाने जिंकली होती. दरम्यान टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाला २ सामने १०० पेक्षा अधिकच्या फरकाने जिंकून देणारा तो पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.