Ind vs Ban, Team India Playing 11 SAAM TV
क्रीडा

Ind vs Ban : अर्धी टीम इंडिया 'जखमी', तरी बांगलादेशशी भिडणार; 'अशी' असेल प्लेइंग ११

India vs Bangladesh : भारताचा निम्मा संघ अनफिट असून आता प्लेइंग ११ निवडणे हे मोठे आव्हान असणार आहे.

Nandkumar Joshi

Ind vs Ban, Team India Playing 11 Prediction : भारत आणि बांगलादेश या दोन संघांमध्ये वनडे मालिका सुरू आहे. तीन सामन्यांपैकी पहिल्या दोन सामन्यांत बांगलादेशनं विजय मिळवून ही मालिका खिशात घातली आहे. टीम इंडियानं मालिकाही गमावली आहे. आता तिसरा सामना जिंकून किमान मालिकेचा शेवट गोड करण्याच्या इराद्यानं भारतीय संघ मैदानात उतरेल. पण हे आव्हान असतानाच दुखापतग्रस्त खेळाडूंची अनुपस्थिती जाणवणार आहे हे नक्की. जवळपास अर्धा संघ दुखापतग्रस्त झाला आहे. कर्णधार रोहित शर्मासह महत्वाचे तीन खेळाडू संघाबाहेर गेले आहेत. अशात उद्या, शनिवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन कशी असेल, याबाबत कमालीची उत्सुकता आहे.

बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका भारतानं गमावली आहे. बांगलादेशनं दोन्ही सामन्यात भारताचा पराभव करून मालिका खिशात घातली आहे. दुसरीकडे, पराभवामुळं टीकेचा सामना करणारी टीम इंडिया आता दुखापतीमुळंही संकटात सापडली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह भारतीय संघातील तीन खेळाडू दुखापतीमुळं संघाबाहेर गेले आहेत. त्यामुळं संघात अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. तर तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियात कुलदीप यादवला संधी मिळाली आहे. (Cricket News)

तीन खेळाडू दुखापतग्रस्त

रोहित शर्माला दुसऱ्या वनडे सामन्यात दुखापत झाली. स्लीपमध्ये झेल घेताना त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्यामुळं तो काही तास मैदानाबाहेर होता. अगदी शेवटच्या क्षणी रोहित शर्मा फलंदाजीला मैदानात उतरला आणि विस्फोटक अर्धशतकी खेळी केली. मात्र, फलंदाजी करतानाही तो वेदनेने विव्हळत होता. या सामन्यानंतर तो पुढचा सामना खेळणार नाही. तो मुंबईला रवाना झाला आहे. दीपक चाहरलाही दुखापत झाली आहे. त्यात कुलदीप सेनही पाठदुखीनं त्रस्त आहे. कुलदीप देखील या मालिकेतून बाहेर झाला आहे. (Team India)

केएल राहुलकडे कर्णधारपद

तिसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. बांगलादेशला तिसऱ्या सामन्यात पराभूत करून भारताला क्लीन स्वीपपासून वाचवण्याचे आव्हान राहुलसमोर असणार आहे. याशिवाय टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडणे हे देखील मोठे आव्हान आहे.

मागील सामन्यात विराट कोहली आणि शिखर धवन हे सलामीला आले होते. पण ते अपयशी ठरले. आता तिसऱ्या वनडे सामन्यात राहुल सलामीला येऊ शकतो. तर रोहितच्या जागी रजत पाटीदार किंवा राहुल त्रिपाठी यांच्यापैकी कुणी एक सलामीला येऊ शकतो. तर गोलंदाजीत कुलदीप यादव काही चमत्कार करणार का, याबाबत उत्सुकता आहे.

अशी असू शकते टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग ११

केएल राहुल, राहुल त्रिपाठी किंवा रजत पाटीदार, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मविआचा मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार - जयंत पाटील

W,W,W,W,W,W,W,W,W,W.. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजाने रणजी ट्रॉफीत राडा केला! Anshulने एकाच डावात घेतल्या 10 विकेट्स

Abeer Gulal Serial: श्री पुन्हा अडकणार संकटात, शुभ्राचा कट यशस्वी; 'अबीर गुलाल' मालिकेत नवा ट्विस्ट

Garden: बगीचा सुंदर दिसण्यासाठी तुमच्या बागेत लावा ही ५ झाडे

Nashik News : नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का; माजी महापौर करणार ठाकरे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT