Ind Vs Ban : टीम इंडिया बांगलादेश दौऱ्यावर असतानाच BCCI ची मोठी घोषणा

बांगलादेशविरुद्ध पराभवाची 'मालिका' सुरू असतानाच बीसीसीआयनं मोठी घोषणा केली आहे.
Team India, BCCI, India vs Bangladesh
Team India, BCCI, India vs BangladeshSAAM TV
Published On

Team India schedule : टीम इंडिया सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात दोन्ही संघांमध्ये तीन वनडे सामन्यांची मालिका आणि त्यानंतर दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यांत भारताचा पराभव झाला आहे. अशात टीम इंडियाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच, बीसीसीआयनं मोठी घोषणा केली आहे. एकाचवेळी बीसीसीआयनं तीन दौऱ्यांची घोषणा केली आहे. त्यात एकूण सहा मालिका खेळायच्या आहेत. टीम इंडिया घरच्या मैदानावरच या मालिका खेळणार आहे. या मालिका आयपीएल २०२३ च्या आधीच खेळवण्यात येणार आहेत.

टीम इंडिया पुढच्या तीन महिन्यांत श्रीलंका, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांविरुद्ध मालिका खेळणार आहे. श्रीलंका संघ भारत दौऱ्यावर येईल. हा दौरा जानेवारीत असेल. त्यानंतर न्यूझीलंड आणि नंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका होणार आहे.

श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी २० मालिका

टीम इंडिया आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारीपासून तीन सामन्यांची टी २० मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ जानेवारीला मुंबई, दुसरा सामना पुण्यात ५ जानेवारीला होईल. तर तिसरा सामना ७ जानेवारीला राजकोटमध्ये होईल. त्यानंतर दोन्ही संघ तीन वनडे सामने खेळतील. हे सामने अनुक्रमे १० जानेवारी, १२ जानेवारी आणि १५ जानेवारीला होतील.

Team India, BCCI, India vs Bangladesh
Ind vs Ban : भारताच्या पराभवानंतर विरेंद्र सेहवागचा खोचक टोला; नेटकरी म्हणाले, सर आता तुम्हीच या!

न्यूझीलंड भारत दौऱ्यावर

न्यूझीलंड जानेवारीमध्येच भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन टी २० सामन्यांची मालिका, तर तीन वनडे सामन्यांची मालिका खेळवली जाईल. पहिला टी २० सामना १८ जानेवारीला हैदराबादमध्ये होईल. दुसरा २१ जानेवारीला रायपूरमध्ये, तर तिसरा टी २० सामना इंदूरमध्ये २४ जानेवारीला होईल. (Cricket News)

Team India, BCCI, India vs Bangladesh
Ind vs Ban : बांगलादेशविरुद्ध पराभवानंतर रोहित शर्माचा खळबळजनक आरोप, म्हणाला....

तीन वनडे सामन्यांची मालिकाही होणार आहे. पहिला वनडे सामना २७ जानेवारीला रांचीत होईल. दुसरा वनडे सामना लखनऊमध्ये २९ जानेवारी रोजी, तर तिसरा वनडे सामना अहमदाबादमध्ये १ फेब्रुवारीला होईल.

ऑस्ट्रेलियाही फेब्रुवारीत येणार भारत दौऱ्यावर

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ फेब्रुवारीत भारत दौऱ्यावर येणार आहे. त्यांच्यात ९ फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात चार कसोटी सामन्यांची मालिका आणि तीन वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. ९ ते १३ फेब्रुवारी दरम्यान नागपूरमध्ये पहिली कसोटी लढत होईल. तर दुसरा कसोटी सामना १७ ते २१ फेब्रुवारीदरम्यान दिल्लीत खेळवला जाईल. धर्मशाला येथे १ ते ५ मार्च दरम्यान तिसरा कसोटी सामना होईल. ९ ते १३ मार्च दरम्यान अहमदाबाद येथे चौथा कसोटी सामना होईल. (Rohit Sharma)

भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांची मालिकाही होईल. मुंबईत १७ मार्चला पहिला वनडे सामना होईल. विशाखापट्टणम येथे १९ मार्च रोजी दुसरा वनडे सामना होईल. २२ मार्च रोजी चेन्नईत तिसरी वनडे लढत होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com