rohit sharma 
क्रीडा

IND vs BAN: कानपूर कसोटी सामना रद्द होणार? वाचा काय आहे कारण?

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर पार पडला होता.

या सामन्यात भारतीय संघाने २८० धावांनी बाजी मारली होती. भारतीय संघ या मालिकेत १-० ने आघाडीवर आहे. मात्र दुसरा सामना सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

कसं असेल हवामान?

भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान अॅक्युवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, २७ सप्टेंबरला म्हणजे सामन्याच्या पहिल्याच दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ९३ टक्के इतकी असणार आहे.

तर २८ सप्टेंबर म्हणजे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे. त्यानंतर तिसऱ्या दिवशी ५९ आणि सामन्याच्या चौथ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ३ टक्के इतकी असणार आहे. त्यामुळे सुरुवातीचे ३ दिवस सामना होणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जरी सामना झाला, तरीदेखील षटकं कमी केली जाऊ शकतात.

सप्टेंबर महिन्यात उत्तर प्रदेशात पाऊस पडतो. त्यामुळे या सामन्यावरही पावसाचं सावट असणार आहे. मात्र आनंदाची बाब अशी की, पाऊस आल्यानंतर कानपूरचं ग्रीन पार्क स्टेडियम पूर्णपणे कव्हर केलं जातं. त्यामुळे पाऊस थांबल्यानंतर अवघ्या काही मिनिटात सामना पुन्हा सुरु केला जाऊ शकतो.

मालिकेतील दुसऱ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस

Bhumi Pednekar: जाळ अन् धूर संगठच! भूमीच्या सौंदर्याचा जलवा

शाब्बास रं पठ्ठ्या! Online Gamingमध्ये गमावले १५ लाख; व्हिडिओ पोस्ट करत SPकडे मागितली मदत

OBC Reservation : ओबीसी आंदोलकांचा आक्रमक पवित्रा

Karjat Picnic Spot : मित्रांसोबत करा भटकंतीचा प्लान कर्जतजवळ अनुभवा निसर्गाचा अद्भुत चमत्कार

SCROLL FOR NEXT