team india twitter
क्रीडा

IND vs BAN 2nd Test : रोहित-गंभीरच्या डावपेचामुळे बांगलादेशचा खेळ खल्लास, टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd Test: कानपूर येथे सुरु असलेल्या कसोटी सामन्यावर भारताने पकड मिळवली आहे. भारताच्या भेदक माऱ्यापुढे बांगलादेशचा दुसरा डाव फक्त १४६ धावात संपुष्टात आलाय. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी अवघ्या ९४ धावांची गरज आहे. आज दिवसभरातील दोन सत्रांचा खेळ बाकी आहे, आशात टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जातोय. बागंलादेशवरील विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये भारतीय संघाचे स्थान अधिक मजबूत होणार आहे.

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. सामन्यातील ३ दिवस पावसामुळे धुतले गेल्यानंतर हा सामना ड्रॉ होणार,असं वाटलं होतं. मात्र भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी आणि धारदार गोलंदाजी करत विजय खेचून आणला आहे. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची गरज आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा संपूर्ण डाव २३३ धावांवर आटोपला. या सामन्यातील पहिल्या दिवशी अवघ्या ३५ षटकांचा खेळ झाला, त्यानंतर पुढील ३ दिवस एकही चेंडू टाकला गेला नाही. बांगलादेशकडून पहिल्या डावात गोलंदाजी करताना, मोमिनूल हकने सर्वाधिक १०७ धावांची खेळी केली. तर कर्णधार नजमूल शांतोने ३१ धावांचे योगदान दिले.

बांगलादेशचा पहिला डाव २३३ धावांवर आटोपल्यानंतर भारतीय संघ फलंदाजीला आला. फलंदाजीला येताच, भारतीय फलंदाजांनी बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. तर केएल राहुलने ६८ धावा केल्या. विराट कोहलीने ४७, शुभमन गिलने ३९ धावा केल्या. भारतीय संघाने ९ गडी बाद २८५ धावांवर आपला डाव घोषित केला.

दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या बांगलादेश संघाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. बांगलादेशचा डाव १४६ धावांवर आटोपला. बांगलादेशकडून सलामीवीर फलंदाज शदमन इस्लामने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करत आली नाही. दरम्यान भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी ९५ धावांची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरण : शाळेच्या अध्यक्ष-सचिवांना मोठा झटका; कोर्टात नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

Dombivali News : खराब रस्त्यांमुळे महिलेचा मृत्यू; डोंबिवलीतील घटना, वयोवृद्धाचाही हात फ्रॅक्चर

Marathi News Live Updates : यवतमाळमधील कळंबमध्ये महाविकास आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

CM Shinde: लाडक्या बहिणींनो! सावत्र भावांपासून सावध रहा; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

Devendra Fadanvis : 'विरोधक एकत्र आलेत, त्यामुळे.. '; फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला कानमंत्र

SCROLL FOR NEXT