kanpur cricket ground twitter
Sports

IND vs BAN 2nd Test: दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द होणार? वाचा कसं असेल हवामान?

India vs Bangladesh 2nd Test, Weather Update: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार कानपूरच्या मैदानावर सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. मालिकेतील दुसरा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये सुरू आहे. या सामन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली. त्यामुळे हा सामना लवकर संपला. पहिल्या दिवसाचा खेळ अवघ्या ३५ षटकात आटोपला. दरम्यान दुसऱ्या दिवशीही पाऊस हजेरी लावणार का? कसं असेल हवामान? जाणून घ्या.

हा सामना सुरू होण्यापूर्वीच हवामान खात्याने पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला होता. पहिल्या दिवसाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला. तर दुसऱ्या दिवशीही पाऊस येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ॲक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी कानपूरमध्ये पाऊस पडण्याची शक्यता ही ८० टक्के इतकी असणार आहे. तर तापमान २५ ते ३० डिग्री सेल्सिअस इतकं असेल. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही पावसामुळे क्रिकेट चाहत्यांची नाराजी होऊ शकते.

हा सामना सुरू व्हायला १ तास उशीर झाला. सामना सुरू झाल्यानंतरही अनेकदा पावसामुळे खेळ थांबला. दुसऱ्या सेशनला सुरुवात झाल्यानंतरही १५ मिनिटे पाऊस पडला. पहिला दिवस संपायला २ तास शिल्लक असतानाही पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ३५ षटकात आटोपला.

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. प्रथम गोलंदाजी करताना आकाश दीपने सुरुवातीलाच बांगलादेशला २ मोठे धक्के दिले. त्यानंतर बांगलादेशच्या फलंदाजांनी मैदानावर टिकून फलंदाजी केली. बांगलादेशकडून मोनिमुल हक ४० धावांवर नाबाद आहे. तर मुशफिकुर रहीम ६ धावांवर नाबाद आहे. बांगलादेशने आतापर्यंत ३ गडी बाद १०७ धावा केल्या आहेत.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारतीय संघाची प्लेइंग ११: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT