team india twitter
क्रीडा

IND vs BAN 2nd T20I: दुसऱ्या सामन्यात टीम इंडियाची प्लेइंग ११ बदलणार? हा खेळाडू करु शकतो पदार्पण

Ankush Dhavre

India vs Bangladesh 2nd T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने शानदार कामगिरी करत बांगलादेशवर ७ गडी राखून एकतर्फी विजय मिळवला.

यासह भारतीय संघाने टी-२० मालिकेत १- ० ने आघाडी घेतली आहे. ग्वालियर टी-२० सामन्यात नितीश कुमार रेड्डी आणि मयांक यादवला पदार्पण करण्याची संधी देण्यात आली होती. आता मालिकेतील दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी दिल्लीत रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात आणखी एक बदल होऊ शकतो. या सामन्यासाठी आणखी एका गोलंदाजाला पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.

हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार?

पहिल्या टी-२० सामन्यात २ खेळाडूंना पदार्पणाची संधी दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी आणखी एक बदल होऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे. असं म्हटलं जातंय, की कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार गोलंदाज हर्षित राणाला टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते. त्याच्याऐवजी नितीश कुमार रेड्डीला विश्रांती दिली जाऊ शकते. तर पहिल्या सामन्यात फलंदाजीची संधी न मिळालेल्या रियान परागला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी दिली जाऊ शकते.

सलामी जोडी बदलणार?

पहिल्या टी-२० सामन्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केलं होतं की, अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात उतरणार . ही जोडी दुसऱ्या सामन्यातही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. पहिल्या टी-२० सामन्यात या जोडीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. संजू सॅमसनने १९ चेंडूत २९ तर अभिषेक शर्माने १६ धावांची खेळी केली होती. गेल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही सूर्याकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर रियान पराग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.

या गोलंदाजांना संधी मिळणार?

भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने गेल्या सामन्यातही चांगली कामगिरी केली होती. या सामन्यात त्याने बांगलादेशच्या ३ फलंदाजांना माघारी धाडलं होतं. त्याला मयांक यादव साथ देताना दिसून येऊ शकतो. या दोन्ही वेगवान गोलंदाजांसह जर हर्षित राणाला गोलंदाजीची संधी दिली गेली. तर हे तिघेही वेगवान गोलंदाज बांगलादेशवर भारी पडू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ranveer Singh: रणवीर सिंगचा रूबाबदार लूक, एकदा बघाच...

Vinesh Phogat : कुस्तीचा आखाडा, ऑलिम्पिक ते निवडणूक; विनेश फोगाटच्या आयुष्यात ८ तारखेचा मोठा योग

Maharashtra Politics: कॉन्फिडन्स वाढला! हरियाणाच्या विजयानं भाजप आक्रमक; राज्यातही पुन्हा महायुती सरकार? वाचा स्पेशल रिपोर्ट

IND vs BAN: मोठी बातमी! दुसऱ्या सामन्याआधी स्टार खेळाडूची निवृत्तीची घोषणा

PM Narendra Modi Speech : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना याच्या पेक्षा मोठी श्रद्धांजली काय असेल; निवडणुकांच्या निकालावर PM मोदी काय म्हणाले? VIDEO

SCROLL FOR NEXT