team india twitter
Sports

IND vs BAN, 1st Test: विराट-रोहित ६-६, गिल ०, तासभरातच टॉप ऑर्डर कोसळली, बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज पडला भारी

India vs Bangladesh 1st Test Live Updates: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरु आहे.

Ankush Dhavre

India vs Bangladesh 1st Test: तब्बल ४३ दिवसांच्या ब्रेकनंतर भारतीय संघ मैदानात उतरला आहे. भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरु आहे. दरम्यान पहिल्याच कसोटीतील सुरुवातीच्या काही तासातस बांगलादेशच्या २४ वर्षीय गोलंदाजाने भारतीय संघाला ३ मोठे धक्के दिले आहेत.

बांगलादेशला आव्हान देण्यासाठी भारतीय संघ आपल्या मजबूत प्लेइंग ११ सह मैदानात उतरला आहे. चेन्नईतील फिरकी गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय संघातील फलंदाज चांगली सुरुवात करतील असं वाटलं होतं. मात्र बांगलादेशच्या २४ वर्षीय वेगवान गोलंदाजाने भारतीय संघाचा खेळ बिघडवला. वेगवान गोलंदाजी करणाऱ्या हसन महमूदने भारतीय संघातील ३ प्रमुख खेळाडूंना माघारी धाडलं.

या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकला आणि यजमान भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात आली.

मात्र या जोडीला चांगली सुरुवात करुन देता आली नाही. अवघ्या १४ धावांवर भारतीय संघाला पहिला मोठा धक्का बसला. रोहित शर्मा अवघ्या ६ धावा करत तंबूत परतला. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या शुभमन गिलवर डाव सांभाळण्याची जबाबदारी होती.

मात्र तो देखील लेग साईडच्या बाहेर पडलेल्या चेंडूवर शॉट मारण्याच्या प्रयत्नात शून्यावर बाद होऊन माघारी परतला.

त्यानंतर विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला. मात्र रोहित आणि गिलप्रमाणे विराटही फार काळ टिकू शखला नाही. तो ६ चेंडूत ६ धावा करत तंबूत परतला. मुख्य बाब म्हणजे या तिन्ही फलंदाजांना हसन महमूदने बाद करत माघारी धाडलं.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

Budhaditya Rajyog: बुध ग्रहाच्या राशीत बनणार बुधादित्य राजयोग; 'या' राशींना गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळणार

SCROLL FOR NEXT