Virat Kohli Saam TV
क्रीडा

Ind vs Ban : विराट कोहलीनं आपल्याच खेळाडूला चिडवलं, नेटमध्ये हटके अंदाज, VIDEO

साम टिव्ही ब्युरो

Ind vs Ban, 1st Test : बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका भारतानं गमावली. पण तिसऱ्या सामन्यात दणदणीत विजय मिळवल्यानंतर टीम इंडिया आधीच्या रंगात आणि ढंगात आलीय. आता उद्यापासून म्हणजे १४ डिसेंबरपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका सुरू होतेय. अखेरच्या वनडेत शतक ठोकल्यानंतर विराट कोहली आता कसोटी सामन्याच्या तयारीला लागलाय. नेटमध्ये सराव करताना विराटला हटके अंदाज बघायला मिळाला.

भारत आणि बांगलादेश यांच्यात बुधवारपासून २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू होत आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंनी कसोटी सामन्याआधी सराव सत्रात भाग घेतला. विराट कोहलीनं (Virat Kohli)  नेटमध्ये सराव करताना बराच घाम गाळला. सरावावेळी त्यानं आपल्याच गोलंदाजाला षटकार ठोकला. त्यानंतर त्याला चिडवलं. विराटचा हा हटके अंदाज चित्रित झाला आहे. हाच अंदाज प्रत्यक्ष कसोटी मालिकेत बघायला मिळतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका जिंकण्याचं भारताचं लक्ष्य असेल. भारतानं आधीच वनडे मालिका गमावली आहे. आता या पराभवाचा वचपा काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे. पहिला सामना चटगावमध्ये खेळवण्यात येणार आहे. याच मैदानावर विराट कोहलीनं काही दिवसांपूर्वी तिसऱ्या वनडेत शतक झळकावलं होतं. सध्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहली जबरदस्त फॉर्मात आहे. (Latest Marathi News)

४० मिनिटे बॅटिंगचा सराव

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी सराव सत्रात विराट कोहली आक्रमक अंदाजात दिसून आला. तर कधी सहकाऱ्यांसोबत मजामस्ती करताना दिसला. त्यानं सुरुवातीला थ्रो डाउनचा सराव केला. त्यानंतर मोहम्मद सिराज, उमेश यादव, आर अश्विन आणि अक्षर पटेल यांच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली. ४० मिनिटे केलेल्या सरावात त्यानं काही आक्रमक फटके लगावले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत होता.

कोहलीनं अक्षरला चिडवलं

कोहलीनं आधी ४० मिनिटं सराव केला. त्यानंतर २० मिनिटं ब्रेक घेतला. त्यानंतर पुन्हा सराव करू लागला. यावेळी अक्षर पटेलच्या गोलंदाजीवरही सराव केला. अक्षरच्या चेंडूवर त्यानं षटकार ठोकल्यानंतर त्याला चिडवलं. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : शिरुरमधील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत राडा

Pune Truck Collapsed : २५ फूट खड्ड्यात कोसळला PMC चा ट्रक; मैलापाणी वाहिन्यांच्या दुरुस्तीकरताना दुर्घटना

Medical College : वैद्यकीय शिक्षण महागलं, 5 पट शुल्क वाढ!

IND vs BAN, 1st Test: रोहित- विराट पुन्हा एकदा फ्लॉप! गिलने मोर्चा सांभाळला; टीम इंडिया आघाडीवर,पाहा Scorecard

Matheran Toy Train : माथेरान ट्रेन आता पावसाळ्यातही धावणार; मध्य रेल्वेचा प्लान आहे तरी काय? वाचा

SCROLL FOR NEXT