Ind Vs Ban 1st Test : बांग्लादेशच्या विरुद्ध विराट कोहली मोठा विक्रम करणार; पहिल्याच टेस्टमध्ये चमकणार

बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला एक मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे.
Virat Kohli News
Virat Kohli News Saam Tv
Published On

Ind Vs Ban 1st Test : भारत विरुद्ध बांग्लादेशचा पहिला कसोटी सामना बुधवारपासून सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियासाठी हा सामना विशेष आहे. त्यामुळे या कसोटी सामन्यावर अनेक क्रिकेटप्रेमींच्या नजरा आहेत. या कसोटी सामन्यात भारताचा स्टार खेळाडू विराट कोहलीला एक मोठा विक्रम करण्याची सुवर्णसंधी आहे. (Latest Marathi News)

Virat Kohli News
Eng vs Pak : इंग्लडकडून पराभवानंतर पाक कसोटी चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून बाहेर, टीम इंडियासमोरही 'हे' मोठे आव्हान

भारत विरुद्ध बांग्लादेशमध्ये खेळण्यात आलेल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा या सचिन तेंडूलकरच्या आहेत. मात्र, विराट हा बांग्लादेशविरुद्ध केवळ ४ कसोटी सामने खेळला आहे. त्यामुळे विराटकडे एक मोठी संधी आहे.

विराटने (Virat Kohli) आतापर्यंत ३९२ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराटला ५०० धावांच्या क्लबमध्ये सामील होण्यासाठी १०८ धावांची गरज आहे. विराटने १०८ धावा केल्यानंतर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, राहुल द्रविडच्या क्लब सामील होऊ शकतो.

Virat Kohli News
Yuvraj Singh : रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देशासाठी खेळला, 2011 वर्ल्ड कप युवराजने गाजवला

बांग्लादेश विरुद्ध भारताच्या फलंदाजांच्या धावा

सचिन तेंडुलकर - ७ सामने, ८२० धावा

राहुल द्रविड - ७ सामने, ५६० धावा

मुशफिकुर रहीम- ६ सामने, ५१८ धावा

विराट कोहली - ४ सामने, ३९२ धावा

गोलंदाजींवर बोलायचं झाल तर, उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विन हे चमकणारे खेळाडू आहेत हे गोलंदाज बांग्लादेशच्या विरुद्ध गडी बाद करण्यात तरबेज आहेत. भारत-बांग्लादेश कसोटी सामन्यात सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम जहीर खानच्या नावावर आहे. जहीर खानने ३१ गडी बाद केले आहेत.

भारत-बांग्लादेश विरुद्ध 'या' गोलंदाजांनी घेतले सर्वाधिक विकेट

जहीर खान - ७ सामने, ३१ विकेट

ईशांत शर्मा - ७ सामने, २५ विकेट

इरफान पठान - २ सामने, १८ विकेट

रविचंद्रन अश्विन - ४ सामने, १६ विकेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com