ind vs ban yandex
Sports

IND vs BAN,1st Test Day 4: चौथ्या दिवशी पाऊस खेळ बिघडवणार? कसं असेल हवामान? जाणून घ्या

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या कसोटीतील चौथ्या दिवशी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Ankush Dhavre

IND vs BAN 1st Test Day 4 Weather Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ ड्रायव्हिंग सीटवर आहे. चौथ्या दिवशी बांगलादेशला सामना जिंकण्यासाठी मोठ्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. सामन्यातील तिसरा दिवस बॅड लाईटमुळे लवकर संपवण्यात आला. दरम्यान सामन्यातील चौथा दिवस निर्णायक असणार आहे. चौथ्या दिवशी कसं असेल हवामान? जाणून घ्या.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही पाऊस पडला. रात्री सुरू झालेला पाऊस सकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होता. मात्र याचा सामन्यावर कुठलाही परिणाम झाला नाही. खेळ वेळेत सुरू झाला. मात्र बॅड लाईटमुळे हा खेळ ठरलेल्या वेळेच्या आधीच संपवण्यात आला.

माध्यमातील वृत्तानुसार चौथ्या दिवशीही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सामन्यावेळी ढगाळ वातावरण असेल. याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो.

भारतीय गोलंदाजांची होणार चांदी

चौथ्या दिवशी पाऊस पडला किंवा ढगाळ वातावरण असेल तर याचा फायदा भारतीय गोलंदाजांना होऊ शकतो. कारण भारतीय संघ ३ वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरला आहे. त्यामुळे ढगाळ वातावरणाचा फायदा भारतीय वेगवान गोलंदाजांना होऊ शकतो.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशचा डाव १४९ धावांवर आटोपला. त्यानंतर दुसऱ्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाचा डाव ४ गडी बाद २८७ धावांवर घोषित करण्यात आला. भारतीय संघाने बांगलादेशसमोर विजयायाठी ५१५ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या धावांचा पाठलाग करताना सामन्याच्या तिसऱ्या दिवशी बांगलादेशचे ४ फलंदाज बाद होऊन माघारी परतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT