team india saam tv news
Sports

IND vs BAN: पहिल्या टी-२० साठी कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११? खेळपट्टी कोणाला देणार साथ?

India vs Bangladesh 1st T20I Match Prediction: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार आहे. दरम्यान या समन्यात कशी असेल प्लेइंग ११? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs BAN 1st T20I: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघामध्ये आजपासून (६ ऑक्टोबर) ३ टी -२० सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. मालिकेतील पहिला सामना ग्वालियरमध्ये रंगणार आहे. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली.

या मालिकेत भारतीय संघाने २-० ने बाजी मारली. दरम्यान पहिल्या टी -२० सामन्यासाठी कशी असेल भारतीय संघाची प्लेइंग ११ आणि खेळपट्टी कोणाला देणार साथ? जाणून घ्या.

कशी असेल खेळपट्टी?

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने याच मैदानावर वनडेतील पहिलं दुहेरी शतक झळकावलं होतं. त्यानंतर या मैदानावर एकही आंतरराष्ट्रीय सामना झालेला नाही. आता याच मैदानावर भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या मैदानावरील खेळपट्टीबद्दल बोलायचं झालं तर, ही खेळपट्टी लाल मातीची असल्याने चेंडूला उसळी मिळेल. त्यामुळे सुरुवातीला गोलंदाजांना चांगली मदत मिळेल. मात्र खेळ जसा पुढे जाईल तसं ही खेळपट्टी फलंदाजीसाठी सोपी होईल.

मॅच प्रेडीक्शन

भारतीय संघाने नुकताच बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने पराभूत केलंय. आता दोन्ही संघ टी -२० मालिकेत भिडणार आहेत. भारतीय संघाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे असणार आहे. याच संघाने श्रीलंकेला श्रीलंकेत जाऊन पराभूत केलं होतं. त्यामुळे या सामन्यातही भारतीय संघाचं पारडं जड असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते भारतीय संघाची संभावित प्लेइंग ११

अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टिरक्षक), सूर्यकुमार यादव, रियान पराग, नितीश रेड्डी, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग,रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मयांक यादव, हर्षित राणा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

Monday Horoscope: कुटुंबातील कटकटी मिटतील, घरात येईल सुख समृद्धी, जाणून घ्या कसा असेन सोमवारचा दिवस

SCROLL FOR NEXT