India Vs Australia Final:  Saamtv
क्रीडा

World Cup Final 2023: एक चूक अन् करोडो भारतीयांचं स्वप्न भंगलं; इथेच टीम इंडियाने गमावली मॅच!

India Vs Australia Final: ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर अंतिम सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड चॅम्पियन ठरली .ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे.

Gangappa Pujari

India vs australia World Cup Final 2023:

ऑस्ट्रेलिया टीम इंडियावर अंतिम सामन्यात विजय मिळवत वर्ल्ड चॅम्पियन ठरली .ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचं आव्हान दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने हे आव्हान 43 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. या सामन्यात भारतीय संघाची फलंदाजीच्या सुरूवातीलाच रोहित शर्माची विकेट गेली. ज्याचा मोठा फटका टीम इंडियाला बसला.

कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) नाणेफेक गमावली पण टीम इंडिया प्रथम फलंदाजीला आली, ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला. मात्र, शुभमन गिल लवकरच आऊट झाल्यामुळे हा आनंद फार काळ टिकला नाही. त्याला केवळ 4 धावा करता आल्या. कर्णधार रोहित शर्माने याआधी आणि नंतरही आक्रमण सुरूच ठेवले आणि चौकारांची बरसात केली.

गिल बाद होऊनही रोहितची तुफानी फटकेबाजी सुरुच होती. त्याने चौकार आणि षटकार मारत स्कोअरबोर्ड हलता ठेवला. दरम्यान अर्धशतकापासून ३ धावा दुर रोहित शर्मा झेलबाद होऊन माघारी परतला. रोहितचा हाच कॅच टीम इंडियासाठी धोक्याची घंटा ठरला. रोहितच्या या विकेटनंतर भारतीय संघाची गळती सुरू झाली.

दरम्यान, पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याला अश्रू अनावर झाले. मैदानात अश्रूंना मोकळी वाट करून न देता धावत धावत ड्रेसिंग रुममध्ये गेला. रोहित शर्मा याचा हा शेवटचा वनडे वर्ल्डकप होता. त्यामुळे त्याच्या भावना या वर्ल्डकपशी निगडीत होत्या. 2019 वर्ल्डकपमध्येही उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. (Latest Marathi News)

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Government Job: कोणत्याही परिक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; RITES मध्ये भरती सुरु; पगार ४६०००, जाणून घ्या सविस्तर

65 वर्षे जुना कायदा बदलण्याच्या तयारीत मोदी सरकार, खासदार अपात्रता कायद्याच्या जागी नवीन कायदा आणण्याची केंद्राची योजना

Maharashtra News Live Updates: पुणे शहरासह जिल्ह्यात आज अनेक नेत्यांच्या सभा

Shani Margi 2024: शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ; 'या' राशींसमोर संकटं येणार, आर्थिक घडी विस्कटणार

Ayushman Bharat Yojana: ५ लाखांपर्यंत मोफत उपचार, कोणत्या हॉस्पिटलमध्ये घेता येणार उपचार; पाहा लिस्ट

SCROLL FOR NEXT