२०२३ च्या विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना सुरू आहे. कोट्यवधी भारतीय टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना करत आहेत. अशातच पुण्यातील एका ज्योतिषाने विश्वविजेता कोण होणार याबद्दल भाकित केले आहे. विशेष म्हणजे, त्यांनी आधी 2023 विश्वचषकातील भारताच्या दहा सामन्यांचं केलेलं भाकित, खरं ठरलंय.
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना सुरू आहे. हा सुरुवातीला थोडा संघर्षाचा होणार आहे. उत्तरार्धामध्ये, म्हणजेच सेकंच हाफमध्ये या सामन्यात भारताचे पूर्णपणे वर्चस्व राहणार आहे.. असे भाकित पुण्यातील ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी केलं आहे. 125 करोड भारतीयांची इच्छा पूर्ण करणारा दिवस' असं उद्याच्या दिवसाचं वर्णन करता येईल, असं ज्योतिष म्हणाले.
रोहित शर्माचं कर्णधारपद ठरणार महत्त्वाचं'
भारताच्या पत्रिकेबरोबर भारतीय संघाचा जो कर्णधार आहे, रोहित शर्मा. याची पत्रिका देखील या काळामध्ये बलवान होत आहे. 3 एप्रिल 1987. यासह रवि मेष राशीमध्ये आहे आणि या रविवरुन गुरुचे भ्रमण सध्या होत आहे, हे अतिशय उत्तम असल्यामुळे रोहित शर्माचा देखील खेळात उत्तम उपयोग होणार आहे. मन्यात भारताला यश मिळण्यात महत्त्वाचं ठरणार आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
दरम्यान, भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील सध्या सुरू असलेल्या सामन्यामधूनही महत्वाच्या अपडेट समोर आल्यात. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाने मोठे धक्के दिले असून ३ फलंदाज स्वस्तात तंबूत परतलेत. सलामीवीर शुबमन गिल अवघ्या ४ धावा करत बाद झाला. दुसऱ्या बाजूला सलामीवीर कर्णधार रोहित शर्माने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. मात्र, तो ४७ धावांवर असताना झेलबाद झाला. त्यानंतर श्रेय्यस अय्यरही लवकर तंबूत परतला. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.