Pune News: पुण्यात नामदेव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं; बचावासाठी पोलिसाची धडपड, EXCLUSIVE व्हिडिओ

Pune News: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं आहे.
Pune News
Pune NewsSaam tv
Published On

सचिन जाधव

Pune Latest News:

पुण्यात नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रकार घडला आहे. पुण्यात लेखक नामदेव जाधव हे भांडरकर इन्स्टिट्यूटमध्ये कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी शरद पवार गटाच्या कार्यकर्यांनी नामदेव जाधवांना काळ फासल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळ फासण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

पुण्यात आज लेखक नामदेव जाधव यांचा दिवाळी भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम होता. सिंगापूरमध्ये शिवजयंती साजरी होणार आहे, या विषयावर आधारित कार्यक्रमाचा विषय होता. मात्र, डेक्कन पोलिसांनी नामदेव जाधव यांच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune News
Aaditya Thackeray: आज बाळासाहेबांना आनंद झाला असता! गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले, CM शिंदेंवरही नेम

कारण राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून नामदेव जाधव यांना काळ फासण्याचा इशारा देण्यात आला होता. शरद पवारांबद्दल नामदेव जाधव यांनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्याचा निषेध म्हणून त्यांना काळं फासणार असल्याचा इशारा कार्यकर्त्यांनी दिला होता.

Pune News
Manoj Jarange In Satara: मंत्रिपदावरून भुजबळांची हकालपट्टी करा, या संभाजीराजेंच्या मागणीवर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले...

दरम्यान, डेक्कन दिवसांनी परवानगी नाकारल्याने नामदेव जाधव एका ठिकाणी थांबून प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. त्याचवेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण करत आणि तोंडाला फासले आहे. नामदेव जाधव यांना काळं फासण्यात येत होतं, त्यावेळी पोलिसांनी त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

Pune News
Farmer Protest: बुलढाण्यात 20 नोव्हेंबरला धडकणार शेतकऱ्यांचे वादळ, सरकार विरोधात एल्गार

एफआयआर दाखल करण्याच काम सुरू

डीसीपी संदीपसिंग गिल यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये उत्सव आहे. त्यासाठी एक सेमिनार आयोजित करण्यात आलं. राजकीय पक्षाने विरोध करण्याच ठरवलं होतं.

कार्यक्रम रद्द झाला होता. नामदेव जाधव विश्रामबाग पोलीस स्टेशन हद्दीत आले होते. माध्यमांना प्रतिक्रिया देताना त्यांच्यावर शाई फेकली, त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांने बचाव करण्याच काम केलं, असं डीसीपी संदीपसिंग गिल यांनी सांगितलं.

'सध्या एफआयआर दाखल करण्याचं काम सुरू आहे. ज्या ठिकाणी कार्यक्रम होता, तिथे सुरक्षा व्यवस्था होती. पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com