Aaditya Thackeray: आज बाळासाहेबांना आनंद झाला असता! गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे पहिल्यांदाच बोलले, CM शिंदेंवरही नेम

Aditya Thackeray Press Conference: गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांवर टीका करत म्हणाले...
Aditya Thackeray Press Conference
Aditya Thackeray Press ConferenceSaam Tv

>> गिरीश कांबळे

Aditya Thackeray Press Conference:

''काल रात्री सकाळी माझ्यावर गुन्हे दाखल केले आहेत. डीलाईल रोड सुरू केला म्हणून म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. डीलाईल रोड पूर्ण होऊन 10 दिवस झाले. तरी देखील घटनाबाह्य सरकारला उद्घाटन करायला वेळ नाही'', असं ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

डिलाई रोड ब्रिजच्या लेनचे उद्घाटन केल्याप्रकरणी आदित्य ठाकरेंसह शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातच आज त्यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते असं म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Aditya Thackeray Press Conference
Chhagan Bhujbal News: 'मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच माझी भूमिका, पण...' छगन भुजबळ स्पष्टच बोलले

'तर माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता'

ते म्हणाले आहेत की, ''तिथे बॅरिकेड्स होते ते आम्ही बाजूला केले. आम्ही पुढे गेलो आणि रस्ता खुला झाला, असं सांगितलं. अनेक वर्षे लोकांना त्रास होत आहे. पण यांना (राज्य सरकारला) उद्घाटन करण्यासाठी वेळ नाही, म्हणून बंद करण्यात आला. मुंबईकरांसाठी महाराष्ट्रासाठी लढत असताना गुन्हे दाखल झाले, तर माझे आजोबा बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असता.'' (Latest Marathi News)

'कंत्राटदार मेव जयते म्हणणारे हे सरकार'

आदित्य ठाकरे म्हणाले की, ''ब्रिजचं काम एवढं लेट का झालं? कंत्राटदाराला ब्लॅक लिस्ट का केलं नाही? आम्ही लोकांसाठी रस्त्यावर उतरलो तर, आमच्यावर गुन्हा दाखल करतात. कंत्राटदार मेव जयते म्हणणारे हे सरकार आहे.

Aditya Thackeray Press Conference
World Cup Final 2023: टीम इंडियाच्या विजयासाठी गणरायाला साकडं; मनसेकडून दगडूशेठ मंदिरात होमहवन अन् महापूजा

आदित्य ठाकरे पुढे म्हणाले की, ''नवी मुंबई मेट्रो 5 महिने थांबवली, का तर उद्घाटनासाठी वेळ नाही. मी राज्यपालांना पत्र लिहून विनंती केली आहे की, सरकारला सांगा जे काम आहे. त्यावर लक्ष द्या म्हणून. मुख्यमंत्री यांच्या नातेवाईकांसाठी रस्ते ब्लॉक केले जातात. एकीकडे भाजप सांगतं व्हीआयपी कल्चर नको आणि दुसरीकडे रस्ते बंद करतात. आम्हाला जर म्हणत असतील की, आम्ही पूल सुरू केल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मग समृद्धी महामार्ग उदघाटन केलं त्यानंतर जे अपघात झाले, लोकांचा मृत्यू झाला, त्यासाठी कोणावर गुन्हा दाखल करायचा?''

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com