सचिन जाधव, प्रतिनिधी
गेल्या महिन्यांपासून सुरू असलेला विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आलायं. संपूर्ण स्पर्धेत अजिंक्य कामगिरी करत रोहित सेना विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचली असून बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी अंतिम मुकाबला करण्यास सज्ज झाली आहे. टीम इंडिया विजयी होण्यासाठी कोट्यवधी भारतीयांनी देव पाण्यात ठेवलेत. पुण्यात मनसेकडून होम हवन करत दगडूशेठ गणपतीकडे टीम इंडियाच्या विजयासाठी साकडं घातलं.
पूर्ण विश्वचषकात अजिंक्य कामगिरी करत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने अंतिम सामन्यात एकदम थाटात एन्ट्री केलीय. चमचमती विश्वचषकाची ट्रॉफी (World Cup 2023) उंचावण्यापासून रोहित सेना आता अगदी एक पाऊल दूर आहे. देशभरातून क्रिकेटप्रेमी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थना अन् शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
पुण्यामध्ये (Pune) महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे (MNS) भारतीय संघाच्या विजयासाठी होमहवन आणि महाआरती करण्यात आली. मनसेचे शेकडो कार्यकर्ते दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जमले होते. तिरंगा हातात घेऊन भारतीय संघाच्या विजयासाठी गणपती मंदिरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कॉंग्रेसकडून कसबा गणपतीची महापूजा
भारतीय संघाच्या विजयासाठी काँग्रेसकडून (Congress) पुण्याचे ग्रामदैवत असलेल्या कसबा गणपतीची महाआरती करण्यात आली. टीम इंडियाची जर्सी घातलेल्या हजारो कार्यकर्त्यांसह लहान मुलांच्या हस्ते कसबा गणपतीची आरती केली. यावेळी इंडिया जीतेगा म्हणत काँग्रेस कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. (Latest Marathi News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.