Ind Vs Aus Rohit Sharma Wicket  Saam Tv
Sports

Ind Vs Aus Live Match : पिताजी मैं फिरसे फेल हो गया.. नको तो शॉट खेळून रोहित शर्मा आऊट, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

Ind Vs Aus Rohit Sharma Wicket : शुबमन गिल बाद झाल्यानंतर रोहित शर्मा अवघ्या २८ धावांवर बाद झाला. महत्त्वपूर्ण सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल व्हायला सुरुवात झाली.

Yash Shirke

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतला पहिला सामना खेळला जात आहे. उपांत्य फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आले आहेत. टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने २६४ धावा केल्या. त्यानंतर भारताचे सलामीवीर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले.

भारताची फलंदाजी सुरु केल्यानंतर चौथ्या षटकामध्ये शुबमन गिल बाद झाला. बेन द्वारशुइसने गिलची विकेट घेतली. गिलने फक्त ८ धावा केल्या होत्या. त्यानंतर विराट कोहली मैदानात उतरला. पुढे सातव्या षटकामध्ये पाचव्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. कूपर कोनोलीच्या फिरकीत रोहित अडकला आणि मैदानाबाहेर गेला.

दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर चाहते निराश झाले. त्यातही कर्णधार रोहित शर्मा फक्त २८ धावांवर बाद झाल्याने भारतीय चाहत्यांनी निराशा व्यक्त केले. रोहितच्या विकेटनंतर सोशल मीडियावर असंख्य मीम्स व्हायरल झाले. वर्ल्डकपमध्ये ज्या प्रमाणे रोहित लवकर बाद झाला होता, त्याच प्रमाणे आजही रोहित शर्माची लवकर विकेट पडल्याने चाहत्यांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे. जो संघ आजचा सामना जिंकेल, तो थेट अंतिम सामन्यात जाणार आहे. भारताने आतापर्यंत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. दुसऱ्या बाजूला ऑस्ट्रेलियानेही स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. हा अटीतटीचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

CM Fadnavis: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; याचिकेतून विधानसभा निवडणुकीतील विजयाला दिलं होतं आव्हान

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोपा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT