rohit sharma twitter
क्रीडा

IND vs AUS: रोहितची रिप्लेसमेंट मिळाली! KL Rahul नव्हे, तर या धाकड फलंदाजाला मिळणार संधी

Rohit Sharma Replacement: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत रोहित शर्मा खेळणार नसल्याची माहीती समोर येत आहे.

Ankush Dhavre

India vs Australia, Dhruv Jurel: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये निर्णायक कसोटी मालिका रंगणार आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाची असणार आहे.

मात्र या मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. कर्णधार रोहित शर्मा पहिल्या आणि दुसऱ्या सामन्याला मुकणार असल्याची माहीती समोर येत आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालसोबत डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र हे कोडं जवळजवळ सुटलं आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेला येत्या २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पर्थमध्ये रंगणार आहे. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा उपलब्ध नसेल.

रोहितने बीसीसीआयला याबाबत आधीच कल्पना दिली आहे. रोहित हा अनुभवी खेळाडू आहे. तो जर महत्वाच्या मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमधून माघार घेणार असेल, तर ही भारतीय संघासाठी टेन्शन वाढवणारी बाब आहे.

हा स्टार फलंदाज घेऊ शकतो, रोहित शर्माची जागा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिका झाल्यानंतर केएल राहुल आणि ध्रुव जुरेलचा ऑस्ट्रेलिया अ विरुद्ध सुरु असलेल्या मालिकेसाठी भारतीय अ संघात समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात केएल राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली.

मात्र तो अवघ्या ४ धावा करत माघारी परतला. तर त्याच्या जोडीला आलेल्या अभिमन्यू ईश्वरनला खातेही उघडता आले नाही. रोहितची रिप्लेसमेंट म्हणून या दोन्ही नावांची चर्चा होती. मात्र दोघेही फ्लॉप ठरले आहेत. तर युवा यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेलने मिळालेल्या संधीचा दोन्ही हातांनी स्विकार करत शानदार ८० धावांची खेळी केली.

भारतीय संघाचा गडगडलेला डाव त्याने सावरला. मात्र त्याचं शतक अवघ्या २० धावांनी हुकलं. त्याची ही शानदार कामगिरी पाहता, त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीतसंघी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. ध्रुव जुरेल कुठल्याही क्रमांकावर येऊन फलंदाजी करु शकतो. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा प्लेइंग ११ मध्ये सलामीवीर म्हणून समावेश केला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray News :...तर मशिदीचे भोंगे बंद करु; राज ठाकरे पुन्हा आक्रमक

Raj Thackeray: शहराचा विचका ‌झालाय, यायला दीड तास लागला; रस्त्यांच्या परिस्थीतीवरून राज ठाकरेंची बोचरी टीका

Health Tip: जास्त भात खाल्ल्याने शरीरावर होतात 'हे' परिणाम

Maharashtra News Live Updates: शहराचा अख्खा विचका झालाय; राज ठाकरेंची टीका

Maharashtra Election : शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? मुंबईचा आखाडा तापणार, मैदानासाठी ठाकरे गट-मनसेनं दंड थोपटले

SCROLL FOR NEXT