India vs Australia, Rohit Sharma: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये बहुप्रतिक्षित बॉर्डर- गावसकर मालिकेला येत्या २२ नोव्हेंबरपासून ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. भारताने नुकतीच न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका ३-० ने गमावली आहे.
त्यामुळे भारताचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठणं कठीण झालं आहे. भारतीय संघाला जर फायनलमध्ये जायचं असेल, तर ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात व्हॉईटवॉश करावा लागेल. जे अशक्य तर नाही, पण कठीण नक्कीच आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघासमोर २ मोठे प्रश्न आहेत.
न्यूझीलंडविरुद्धची मालिका झाल्यानंतर रोहित शर्माने मोठी अपडेट दिली होती. तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या कसोटीत उपलब्ध नसणार असल्याचं म्हटलं जात आहे. यासह दुसऱ्या कसोटीसाठी तो उपलब्ध असेल याची शक्यता खूप कमी आहे.
या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. तर उपकर्णधारपदी जसप्रीत बुमराहची निवड करण्यात आली आहे.
मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्मा उपलब्ध नसेल, त्यामुळे रोहित शर्माऐवजी जसप्रीत बुमराह नेतृत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसेल. मात्र बुमराहला नेतृत्वाचा फारसा अनुभव नाही.
बुमराहने १ सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. या सामन्यात भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. या एका सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे बुमराह भारतीय संघाचं नेतृत्व करु शकेल का? हा मोठा प्रश्न आहे.
सध्या रोहित आणि यशस्वीची जोडी डावाची सुरुवात करत आहे. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे रोहितच्या जागी डावाची सुरुवात कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. रोहितची जागा घेण्यासाठी केएल राहुल आणि ध्रुव जुरेल हे दोघेही पर्याय आहेत. मात्र कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.