rohit sharma pat cummins yandex
क्रीडा

IND vs AUS: खरंच ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात 4-1 ने हरवणं शक्य आहे का? BGT मध्ये कसा राहिलाय दोन्ही संघांचा रेकॉर्ड?

India vs Australia, Border -Gavaskar Trophy Head To Head Record: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. दरम्यान कसा राहिलाय या दोन्ही संघांचा हेड टू हेट रेकॉर्ड?

Ankush Dhavre

India vs Australia, Head To Head Record: क्रिकेट हा खेळा अधिकृतरित्या सुरु होऊन १४७ वर्षे होऊन गेली आहेत. या १४७ वर्षांमध्ये अनेक रोमांचक रंगल्या. मात्र प्रेक्षकांना मैदानात खेचून आणणाऱ्या मालिका म्हणजे, भारत- पाकिस्तान यांच्यात होणारी मालिका, अॅशेस मालिका आणि तिसरी म्हणजे बॉर्डर- गावसकर ट्रॉफी.

क्रिकेट अॅक्शन, रोमांचक सामने, दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये होणारी बाचाबाची या मालिकेचा रोमांच आणखी वाढवते. दोन्ही संघांचं एकच लक्ष असतं, ते म्हणजे मालिका विजय.

गेल्या दोन मालिकांमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात जाऊन पराभूत केलंय. त्यामुळे यावेळी भारतीय संघ आगामी कसोटी मालिका जिंकून मालिका विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

बॉर्डर- गावसकर ट्रॉफी हे १९९६ मध्ये झालेल्या मालिकेतून पडलं. तेव्हापासून ते आतापर्यंत या मालिकेत एकापेक्षा एक रोमांचक सामने पाहायला मिळाले आहेत. या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत ५६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान भारतीय संघाने २४ सामने जिंकले आहेत. तर २० सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. यादरम्यान १२ सामने ड्रॉ झाले आहेत.

मायदेशात खेळण्याचा फायदा

ही मालिका दोन्ही देशांमध्ये खेळली जाते. त्यामुळ दोन्ही संघांना याचा फायदा होतो. भारताने मायदेशात खेळताना २९ सामने खेळले आहेत. यादरम्यान १८ सामने जिंकले आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा मायदेशात खेळतानाचा रेकॉर्ड पाहिला, तर ऑस्ट्रेलियाने २७ सामने खेळले आहेत. यादरम्यान केवळ १४ सामने जिंकता आले आहेत.

बॉर्डर- गावसकर ट्रॉफीत भारताचं वर्चस्व

केवळ सामन्यांच्या बाबतीत नव्हे, तर मालिका जिंकण्याच्या बाबतीतही भारतीय संघ आघाडीवर आहे. आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये १६ मालिका खेळल्या गेल्या आहेत. यादरम्यान भारतीय संघाने १० मालिका जिंकल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाला केवळ ५ मालिका जिंकता आल्या आहेत. त्यामुळे भारतीय संघाचं पारडं जड राहिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi: मविआला देशापेक्षा आघाडी महत्वाची; अखेरच्या प्रचारसभेत पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा घेतला समाचार

Rahul Gandhi: महाराष्ट्रातील बेरोजगारीला गुजरात जबाबदार? राहुल गांधींनी काढली उद्योगांची कुंडली

Maharashtra News Live Updates: ५ कोटींचे सोने आणि १७ लाखांची चांदी जप्त, अमरावतीच्या नागपुरी गेट पोलिसांची कारवाई

Assembly Election: कामठीचं महाभारत ! कामठीत चंद्रशेखर बावनकुळे चौकार मारणार?

'Jodha Akbar' चित्रपटाचे शूटिंग कोणत्या किल्ल्यावर झाले? अनुभवाल डोळ्यांचे पारणे फेडणारे सौंदर्य

SCROLL FOR NEXT