usman khawaja twitter
Sports

IND vs AUS 3rd Test: ब्रिस्बेनमध्ये पावसाचा खेळ चाले! एकाच सेशनमध्ये दोनदा थांबवावा लागला सामना

India vs Australia 3rd Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबामध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या गाबामध्ये सुरु आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. मात्र पहिल्याच दिवशी पावसाचा खेळ पाहायला मिळाला आहे. पहिल्या सत्रात दोन वेळा पावसामुळे खेळ थांबवावा लागला आहे.

या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने या मालिकेत सलग तिसऱ्यांदा नाणेफेक जिंकलं आणि ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांची जोडी मैदानावर आली.

नाणेफेक भारतीय संघाने जिंकलं आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला खरा, पण भारतीय गोलंदाजांना याचा फायदा करुन घेता आला नाही. कारण ढगाळ वातावरण होतं. मात्र गोलंदाजांना विकेट मिळवून देता आली नाही. सामन्यातील सहावे षटक सुरु असताना, पावसाने हजेरी लावली .त्यामुळे सामना थांबवावा लागला. हा पाऊस १५ ते २० मिनिट सुरु होता, त्यानंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात झाली.

ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने संघाला चांगली सुरुवात करुन दिली. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल होती. मात्र तरीही ऑस्ट्रेलियाच्या सलामी जोडीने टिचून फलंदाजी केली. त्यानंतर १४ व्या षटकात पावसाचा जोर आणखी वाढला. त्यामुळे सामना पुन्हा एकदा थांबवावा लागला.

या सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११:

केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत, रविंद्र जडेजा, नितिश कुमार रेड्डी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद सिराज, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT