IND vs AUS 
Sports

IND vs AUS: हेडला रोखलं, पण मॅक्सवेलने शतक झळकावलं, ऑस्ट्रेलियाने सामना जिंकत टीम इंडियाचा विजयी रथ रोखला

India vs Australia 3rd T20 Match: तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून टीम इंडियाची विजयी घौडदौड रोखली. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकून टीम इंडियाचं तिसरा सामन्यात मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं.

Vishal Gangurde

India vs Australia 3rd T20 Match:

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० सामन्याची मालिका सुरु आहे. याच मालिकेचा तिसरा सामना गुवाहाटी क्रिकेट स्टेडियमवर झाला. मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने सामना जिंकून टीम इंडियाची विजयी घौडदौड रोखली. ऑस्ट्रेलियाने तिसरा सामना जिंकल्याने टीम इंडियाचं तिसऱ्या सामन्यात मालिका जिंकण्याचं स्वप्न भंगलं. (Latest Marathi News)

गुवाहाटीत झालेल्या रोमहर्षक झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियावर टीम इंडियाने ५ गडी राखून विजय मिळवला. टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात तीन गडी गमावून २२२ धावा कुटल्या.

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या मॅक्सवेलने शतक झळकावत सामना जिंकवला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात ५ गडी गमावून २२५ धावा करून सामना जिंकला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

टीम इंडियाने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेड आणि हार्डीने चांगली सुरुवात केली. मात्र, हार्डी १२ चेंडूत १६ धावा करु शकला. ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का ४७ धावांवर बसला. त्यानंतर हेड ३५ धावांवर बाद झाला.

जोशही फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. टिम डेव्हिड शून्य धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने डाव सावरला. पुढेही मॅक्सवेलने झुंझार खेळ सुरु ठेवला. मॅक्सवेलने पुढे शतकी खेळी खेळत ऑस्ट्रेलियाला सामना जिंकून दिला.

ऋतुराजची खेळी ठरली व्यर्थ

भारताने प्रथम फलंदाजी करताना ऋतुराजच्या शतकाच्या जोरावर २० षटकात ३ गडी गमावून २२२ धावा केल्या. भारतासाठी ऋतुराजने सर्वाधिक धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात खराब झाली. यशस्वी जयस्वाल अवघ्या ६ धावांवर बाद झाला. ईशान किशनही स्वस्तात माघारी परतला. यानंतर सूर्यकुमार आणि ऋतुराजने डाव सावरला.

सूर्यकुमार ३९ धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज आणि तिलकने १४१ धावांची भागादारी रचली. गायकवाडने डावात ७ षटकार आणि १३ चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाकडून जेसन बेहरेनडॉर्फ, केन रिचर्डसन आणि आरोन हार्डीने प्रत्येकी १-१ गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'आयत्या बिळात नागोबा' या म्हणीचा अर्थ काय?

Maharashtra Politics: महाराष्ट्र राज्य सहकारी संघावर भाजपचं वर्चस्व, प्रवीण दरेकरांकडे एकहाती सत्ता

Akot News : पुराचा वेढा; संपर्क तुटला; अमिनापूरमधील शेकडो ग्रामस्थ अडकले

Ind Vs Eng Oval Test : इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीत टीम इंडियात होणार मोठे बदल, जसप्रीत बुमराह खेळणार?

पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाच! ३ दहशतवाद्यांना धाडलं यमसदनी, अमित शहांनी संसदेत काय-काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT