IND Vs AUS  x
Sports

IND vs AUS playing 11 : अर्शदीपला बाहेरचा रस्ता, कुलदीपची एन्ट्री; शुभमनची सैना क्लीन स्वीप टाळणार का?

India vs Australia 3rd ODI playing 11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडिया क्लीन स्वीप टाळण्यासाठी मैदानात उतरली आहे. शुभमन गिलने पुन्हा नाणेफेक गमावली असून विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.

Namdeo Kumbhar

India vs Australia 3rd ODI: कांगारूविरोधात क्लीन स्वीप टाळण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. भारतीय संघाने पुन्हा एकदा नाणेफेक गमावली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन वनडे सामन्यात भारताचा दारूण पराभव करत मालिका खिशात घातली. २-० आघाडी घेणाऱ्या ऑस्ट्रेलियाने विजयी संघ कायम ठेवला आहे. पण दुसरीकडे टीम इंडियाने मात्र दोन बदल केले आहेत.

विराटकडे सर्वांच्या नजरा -

लागोपाठ दोन सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या विराट कोहलीकडून सिडनीच्या मैदानावर आज मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. दुसरीकडे कर्णधार गिल आणि केएल राहुल यांनाही अद्याप सूर गवसलेला नाही. त्यामुळे गिल आणि विराट यांच्या कामगिरीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सिडनीच्या मैदानावर विराट कोहलीचा रेकॉर्ड अतिशय खराब आहे. त्याला सात सामन्यात फक्त एक अर्धशतक ठोकता आलेय.

भारताने पुन्हा नाणेफेक गमावली -

अखेरच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिशेल मार्श याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाच्या कर्णधाराने लागोपाठ १८ व्यांदा नाणेफेक गमावली आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासातील हा अनोखा रेकॉर्ड झाला आहे. शुभमन गिल याने लागोपाठ तिसऱ्या वनडे सामन्यात नाणेफेक गमावली आहे.

भारतीय संघात २ बदल -

लागोपाठ दोन सामने गमावलेल्या टीम इंडियाने क्लीन स्वीप टाळण्यासाठी संघात दोन महत्त्वाचे बदल केले आहेत. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह आणि नितीश कुमार रेड्डी यांना आराम दिला आहे. चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला संधी देण्यात आली. त्याशिवाय प्रसिद्ध कृष्णा यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

प्रतिस्पर्धी संघात कोण कोण?

अखेरच्या वनडे सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग ११ -

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली,श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंगन सुंदर, हर्षित राणा, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाची प्लेईंग ११ -

मिशेल मार्श (कर्णधार), ट्रेविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅथ्यू रेनशॉ, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), कूपर कोनोली, मिशेल ओवेन, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, एडम जम्पा, जोश हेजलवूड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ahilyanagar News: सीएनजी पंपावर कर्मचाऱ्यांची मुजोरी; वाहनात गॅस भरण्यावरून दाम्पत्याला मारहाण

Maharashtra Politics: महायुतीतील कुरघोडीमुळे शिंदे नाराज? शिंदे पुन्हा दिल्ली दरबारी

Bihar Election : निवडणुकीआधीच मुख्यमंत्र्यांची मोठी कारवाई; सत्ताधारी पक्षाने माजी मंत्र्यांसहित ११ आमदारांना केलं निलंबित

Eye Health: वारंवार डोळे चोळण्याची सवय आहे? तर वेळीच थांबवा, नाहीतर...

धनंजय मुंडेंना दणका! गोपीनाथ मुंडेंचे वारसदार कोण? पंकजा घेतली या दोन नेत्यांची नावे|VIDEO

SCROLL FOR NEXT