India vs Australia 2nd ODI, Weather Update ind vs aus weather forecast indore holkar stadium cricket news in marathi Saam tv news
क्रीडा

IND vs AUS 2nd ODI, Weather Update: इंदुर वनडेवर पावसाचं सावट? सामन्यावेळी कसं असेल हवामान?

IND vs AUS 2nd ODI, Weather Update: वाचा या साामन्यावेळी कंस असेल हवामान.

Ankush Dhavre

India vs Australia 2nd ODI, Weather Update:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ करत ५ गडी राखून विजय मिळवला.

तर दुसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यावेळी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेदरम्यान पाऊस पडू शकतो. दिवसा पाऊस असेल तर रात्री पाऊस पडण्याची शक्यता खूप कमी आहे.

या अंदाजानुसार, दुपारी १ ते ६ च्या दरम्यान पाऊस पडण्याची शक्यता ही ४०-५० टक्के इतकी असणार आहे. त्यानंतर ही शक्यता कमी होत जाईल. हा सामना दुपारी १:३० वाजता सुरू होईल. सामन्यावेळी तापमान २९ डिग्री सेल्सिअस इतकं राहील.

भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा सामना..

मोहालीच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान गाठलं आहे. आता भारतीय संघासमोर ही रँकिंग टिकवून ठेवण्याचं आव्हान असणार आहे.

कारण नंबर १ बनण्यासाठी पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ देखील शर्यतीत आहेत. आजच्या सामन्यात जर भारतीय संघाने विजय मिळवला, तर आगामी वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा संघ नंबर १ म्हणून मैदानात उतरेल. (Latest sports updates)

पहिल्या वनडेबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना २७६ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ५ गडी आणि ८ चेंडू शिल्लक ठेऊन हा सामना जिंकला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT