India vs Australia 2nd odi live austrlia need 400 runs to win ind vs aus live updates  twitter
क्रीडा

IND vs AUS, 2nd ODI: गिल-अय्यरने झोडलं अन् राहुल-सूर्याने फोडलं, ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने उभारली सर्वोच्च धावसंख्या

India vs Australia 2nd ODI Live Updates: या डावात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळताना सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे.

Ankush Dhavre

India vs Australia 2nd ODI Live Updates:

इंदुरच्या मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाकडून दमदार खेळ पाहायला मिळाला आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाने ५० षटक अखेर ५ गडी बाद ३९९ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ४०० धावांची गरज आहे.

गिल- अय्यरचं शतक..

या सामन्यात डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला चांगली सुरूवात करता आली नव्हती. ऋतुराज गायकवाड अवघ्या ८ धावा करत माघारी परतला. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि शुबमन गिलने २०० धावांची भागीदारी करत भारतीय संघाची धावसंख्या २०० धावांच्या पार पोहचवली.

या डावात शुबमन गिल ९० चेंडूंमध्ये १०५ धावांची खेळी करत माघारी परतला. तर शुबमन गिल ९७ चेंडूंमध्ये १०४ धावांची खेळी करत माघारी परतला. (Latest sports updates)

सूर्या-राहुलचं अर्धशतक..

गिल आणि श्रेयस अय्यर बाद झाल्यानंतर ईशान किशनने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर हल्लोबोल केला. ईशान किशनने ताबडतोड फलंदाजी करत ३१ धावा चोपल्या. मात्र त्यानंतर तो बाद होऊन माघारी परतला.

शेवटी कर्णधार केएल राहुल आणि सूर्यकुमार यादव आणि केएल राहुलने तुफान फटकेबाजी केली. केएल राहुलने या डावात ३८ चेंडूंचा सामना करत ५२ धावा चोपल्या. तर राहुल बाद झाल्यानंतर सूर्याने नाबाद ७२ धावा ठोकत भारतीय संघाची धावसंख्या ३९९ पर्यंत पोहचवली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA 3rd T20I: ना पाऊस, ना वादळ तरीही सामना थांबला; खेळाडू मैदानाबाहेर पळाले, नेमकं काय घडलं?

Baba Siddique Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा, गोळीबारानंतर आरोपी लीलावती रुग्णालयात गेलेला

DA Hike: केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात १२ टक्क्यांनी वाढ, तुमचा पगार किती होणार?

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

SCROLL FOR NEXT